शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया व राहुल गांधी यांची ११ रोजी सभा

By admin | Updated: April 2, 2016 03:22 IST

अ.भा. काँग्रेस समितीतर्फे ११ एप्रिल रोजी नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्ष सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दीक्षाभूमीवर जाऊन दर्शन घेणार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंतीनागपूर : अ.भा. काँग्रेस समितीतर्फे ११ एप्रिल रोजी नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्ष सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेणार आहेत. काँगेसचे शीर्षस्थ दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी ही सभा अतिशय गांभीर्याने घेतली असून जोरात तयारी चालविली आहे.प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार दुपारी ४ वाजता विमानाने सोनिया व राहुल गांधी यांचे दिल्लीहून विमानाने नागपुरात आगमन होईल. दुपारी ४.३० वाजता ते दीक्षाभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन करतील. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता कस्तुरचंद पार्क येथे आयोजित जाहीर सभेला मार्गदर्शन करतील. नागपुरात उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे हा कार्यक्रम तासभर पुढे ढकलण्याचाही विचार सुरू आहे. सभेला लाखावर गर्दी होईल, असा दावा प्रदेश काँग्रेसने केला आहे. प्रदेशाध्यक्षांनी घेतल्या मॅराथॉन बैठकानागपूर : सभेच्या तयासाठी आज, शुक्रवारी नागपुरात अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मॅराथॉन बैठका घेतल्या. बैठकीला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसच्या अनुसूचित जाती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. राजू, सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, शिवाजीराव मोघे, नसीम खान, राजेंद्र मुळक, आ. शरद रणपिसे, आ. विजय वडेट्टीवार, माजी आ. अशोक धवड, अनंतराव घारड, डॉ.बबनराव तायवाडे, नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे, यांच्यासह विदर्भातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दिग्विजय सिंह यांनी नागपुरात आगमन होताच दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्र्शन घेतले. तेथे लागलेल्या छायाचित्रांची पाहणी केली. सोनिया व राहुल गांधी देखील येथे भेट देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी आढावा घेतला. त्यांच्यासोबत माजी मंत्री नितीन राऊत, अनिस अहमद होते. यानंतर सिंग यांनी कस्तुरचंद पार्कची पाहणी केली. (प्रतिनिधी)