शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बकरीच्या पिल्यावरून खुनी हल्ला करणाऱ्या  बापलेकास कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 20:32 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : बकरीचे पिलू घरी का आले, असे हटकल्याने झालेल्या भांडणातून खुनी हल्ला करून दोन भावंडांवर चाकूने हल्ला करून जखमी करणाऱ्या  आरोपी बापलेकास तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.जालंधर महादेव झिंगारे (२४) आणि ...

ठळक मुद्देतदर्थ न्यायालयाचा निकालमौदानजीकच्या तांडा येथील घटना

आॅनलाईन लोकमतनागपूर : बकरीचे पिलू घरी का आले, असे हटकल्याने झालेल्या भांडणातून खुनी हल्ला करून दोन भावंडांवर चाकूने हल्ला करून जखमी करणाऱ्या  आरोपी बापलेकास तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.जालंधर महादेव झिंगारे (२४) आणि महादेव लक्ष्मण झिंगारे (५६) दोन्ही रा. तांडा, अशी आरोपींची नावे आहेत. मुकेश मारोती फटिंग (२६) आणि सुरेश मारोती फटिंग (३०) दोन्ही रा. तांडा, अशी घटनेच्या वेळी जखमी झालेल्यांची नावे होती.खुनी हल्ल्याची ही घटना १८ जून २०१५ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली होती. जखमी फटिंग बंधू आणि झिंगारे पिता-पुत्र एकमेकांच्या शेजारी राहायचे. घटनेच्या दिवशी फटिंग बंधूंचे बकरीचे पिलू आरोपी झिंगारे यांच्या घरात शिरताच जालंधर आणि महादेव यांनी फटिंगच्या घरावर जाऊन त्यांच्याशी भांडण केले होते. मुकेशचा मोठा भाऊ सुरेश हा जन्मत:च मुका असूनही त्याने आरोपींना समजाविण्याचा प्रयत्न केला होता तरीही आरोपी जुमानत नव्हते. अखेर भांडण विकोपाला जाऊन जालंधरने मूक सुरेशच्या पोटावर, छातीवर चाकूने वार करून जखमी केले होते. महादेवनेही सुरेशवर चाकूने वार केले होते. मुकेशने आपल्या भावाला वाचविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याच्यावरही वार केले होते. लागलीच गंभीर जखमी सुरेशला भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मुकेश फटिंग याच्या तक्रारीवरून अरोली पोलीस ठाण्यात भादंविच्या ३०७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. सुरेश हा मुका असल्याने त्याचे मौखिक मृत्यूपूर्व बयान नोंदवून न घेता, त्याने हे बयान स्वत: लिहून दिले होते. न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर ३०७ कलमांतर्गतचा गुन्हा ३२४ कलमांतर्गत परिवर्तित करून आरोपींना शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील मदन सेनाड, तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. एस. एल. कोतवाल यांनी काम पाहिले.

 

टॅग्स :Courtन्यायालय