शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्याच, पोलीसांच्या अमाणूष मारहाणीतच मृत्यू; रामदास आठवलेंचा आरोप

By आनंद डेकाटे | Updated: January 5, 2025 14:27 IST

केंद्रीय राज्यमंत्री आठवले रविवारी नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. रामदास आठवलेंची दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परभणी येथील आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी केलेल्या अमाणूष मारहाणीमुळेच मृत्यू झाला असून त्यांची हत्याच झाली आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट करीत संविधानाच्या सन्मानासाठी झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवर अशा अमाणूष पद्धतीने मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली.

केंद्रीय राज्यमंत्री आठवले रविवारी नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांना कुठलाही आजार नव्हता. पोलिसांच्या बेछुट मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना आजार असल्याचा बनाव पोलीस करीत आहेत. संविधानाचा अपमान अपमान म्हणजे देशाचा अपमान होय. त्यामुळे जेव्हा संविधानाचा अपमान झाला तर साहजिकच त्या विरोधात उद्रेक होणारच.सर्व पक्षांनी याविराेधात आंदोलन करायला हवे होते, परंतु तसे झाले नाही. संविधानाच्या सन्मानासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस अशा प्रकारे मारहाण करीत असतील तर त्या पोलीसांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणातील आरोपी काही माथेफिरू नव्हता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.या प्रकरणाची विशेष चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच बीड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. पत्रपरिषदेला पक्षाचे ज्येष्ठ नेते गौतम सोनवणे, विजय आगलावे, राजन वाघमारे, बाळू घरडे,विनोद थूल आदी उपस्थित होते.

‘एक देश एक इलेक्शन’ संविधानातच तरतूद‘एक देश एक इलेक्शन’ याची संविधानातच तरतूद आहे. सुरुवातीच्या काही निवडणुका तशाच पद्धतीने झाल्या. परंतु नंतर सत्ताधारी पक्षाचा पाठींबा काढण्याच्या घटनेनंतर ही पद्धत विस्कळीत झाली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या या बिलाला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठींबा असल्याचे आठवले यांनी एका प्रश्नाच्या स्पष्ट केले.

...तर मनपा, जि.प.च्या निवडणुका स्वबळावर लढणाररामदास आठवले म्हणाले, रिपाइंसाठी राज्यात एक मंत्रीपद व एमएलसीची मागणी आम्ही केली होती. परंतु ती मिळाली नाही. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये आम्हाला काही जागा मिळाव्या, तसे झाले नाही तर रिपाइं मनपा, जि.प.च्या निवडणुका स्वबळावर लढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले