शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनो लक्ष द्या! नागपूरहून मुंबई, पुणे, गोव्याकडे जाणाऱ्या काही रेल्वे रद्द; 'या' गाड्यांच्या मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2022 18:25 IST

नॉन इंटरलॉकींग, थर्ड- फोर्थ लाइनचे काम; ३-६ डिसेंबरदरम्यान रेल्वेसेवा प्रभावित

नागपूर : जळगाव आणि भुसावळ विभागात नॉन इंटरलॉकींगचे काम आणि थर्ड व फोर्थ लाइनच्या कामामुळे नागपूर विभागातून धावणाऱ्या १४ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून सात रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ३ डिसेंबरला ०११३९ नागपूर- मडगाव एक्स्प्रेस, ४ डिसेंबरला १२११४ नागपूर- पुणे एक्स्प्रेस, २२१३७ नागपूर- अहमदाबाद एक्स्प्रेस, १२१०५ मुंबई- गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस आणि ०११४० मडगाव- नागपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

५ डिसेंबरला १२१३६ नागपूर- पुणे एक्स्प्रेस, १२११३ पुणे- नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस, १२१४० नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, १२१३९ मुंबई- नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, २२१३८ अहमदाबाद- नागपूर एक्स्प्रेस, ११०३९ कोल्हापूर- गोंदिया एक्स्प्रेस, ११०४० गोंदिया- कोल्हापूर एक्स्प्रेस, १२१०६ गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस आणि ६ डिसेंबरला १२१३५ पुणे- नागपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

'या' रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल 

  • २२९४० बिलासपूर- हापा एक्स्प्रेस ५ डिसेंबरला बडनेरा- भुसावळ- खंडवा- इटारसी- संत हिरदाराम नगर- रतलाम- छायापुरी या मार्गाने धावणार
  • १२८३४ हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस ४ डिसेंबरला बडनेरा- भुसावळ- खंडवा- इटारसी- रतलाम- भोपाळ- छायापुरी या मार्गाने धावणार
  • १२६५६ चेन्नई सेंट्रल- अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस ४ व ५ डिसेंबरला बडनेरा- भुसावळ- खंडवा- इटारसी- रतलाम- भोपाळ- छायापुरी या मार्गाने धावणार
  • २०८१९ पुरी- ओखा द्वारका एक्स्प्रेस ४ डिसेंबरला बडनेरा- भुसावळ- खंडवा- इटारसी- भोपाळ- रतलाम- छायापुरी या मार्गाने धावणार
  • २२८२७ पुरी- सुरत एक्स्प्रेस ४ डिसेंबरला बडनेरा- भुसावळ- खंडवा- इटारसी- संत हिरदारामनगर- रतलाम- वडोदरा या मार्गाने धावणार
  • १२९९४ पुरी- गांधीधाम एक्स्प्रेस ५ डिसेंबरला बडनेरा- भुसावळ- खंडवा- इटारसी- भोपाळ- रतलाम- छायापुरी या मार्गाने धावणार
  • १२९५० संत्रागाछी- पोरबंदर कवीगुरु एक्स्प्रेस ४ डिसेंबरला बडनेरा- भुसावळ- खंडवा- इटारसी- भोपाळ- रतलाम- छायापुरी या मार्गाने धावणार
टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर