शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅट’चा आदेश लागू केल्यास काहींना प्रमोशन, काहींचे डिमोशन

By admin | Updated: July 30, 2014 01:14 IST

अव्वल कारकून आणि मंडल अधिकाऱ्यांच्या ज्येष्ठता सूचीत दुरुस्ती करून कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या (मॅट) निर्णयाची नागपूर महसूल विभागात अंमलबजावणी

चंद्रशेखर बोबडे - नागपूरअव्वल कारकून आणि मंडल अधिकाऱ्यांच्या ज्येष्ठता सूचीत दुरुस्ती करून कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या (मॅट) निर्णयाची नागपूर महसूल विभागात अंमलबजावणी झाल्यास विभागातील शंभरावर कर्मचाऱ्यांवर पदावनत (डिमोशन) होण्याची तर तेवढ्याच कर्मचाऱ्यांना पदोन्नती (पदोन्नती) मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायाधीकरणाच्या या निर्णयाची प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.अव्वल कारकून संवर्गातून पदोन्नती देण्याचा मुद्दा सध्या नागपूर व कोकण विभागात जोरदार गाजत आहे. ज्येष्ठता सूचीवर कर्मचाऱ्यांचा आक्षेप असून या सूचीच्या आधारावर देण्यात आलेल्या पदोन्नत्या नियमबाह्य असल्याची त्यांची तक्रार आहे. नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांनी पदोन्नत्यांच्या विरोधात महसूल मंत्र्याकडे दाद मागितली तर कोकण विभागातील कर्मचारी दिनेश दैठनकर यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाकडे दाद मागितली होती. ११ जुलै २०१४ रोजी यावर निकाल दिला. न्यायाधीकरणाने कर्मचाऱ्याचा मुद्दा ग्राह्य ठरविताना अव्वल कारकून संवर्गात दिलेल्या पदोन्नतीच्या दिनांकापासून यादी तयार करून (दुरुस्त करून)नव्याने पदोन्नती देण्याचे आदेश दिले. तसेच जुन्या पदोन्नत्या रद्द करण्यास सांगितले. यासाठी आठ आठवड्यांचा वेळ दिला.या आदेशाचा आधार घेऊन १६ जुलैला वन व महसूल विभागाने नागपूरसह सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून ज्येष्ठता सूची दुरुस्त करण्यास सांगितले आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार नागपूर विभागातही न्यायाधीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास अव्वल कारकून संवर्गातून पदोन्नती मिळालेल्यांना पदावनत व्हावे लागेल व नव्याने काही पदोन्नत्या होतील. विभागात अशा कर्मचाऱ्यांची संख्या ७५ ते १२५ आहे हे येथे उल्लेखनीय.