शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

माती नाल्यात;पैसा पाण्यात

By admin | Updated: June 20, 2016 02:30 IST

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे उत्तर नागपुुरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.

नागपूर : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे उत्तर नागपुुरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. पिवळी नदी व नाल्याकाठावरील वस्त्यात पाणी शिरल्याने मोठी हानी झाली होती. शहरातील खोलगट भागातील वस्त्या व नदी-नाल्याकाठावरील वस्त्यांना दरवर्षीच्या पावसाळ्यात धोका निर्माण होतो.अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील तीन प्रमुख नद्या व २२६ नाले स्वच्छ करण्याचे अभियान हाती घेतले आहे. हजारो टन गाळ व कचरा जमा करण्यात आला. यातील काही ठिकाणचा गाळ दुसरीकडे नेण्यात आला. परंतु अद्याप ठिकठिकाणी नदी -नाल्याच्या काठावर व पात्रात जमा करण्यात आलेला गाळ तसाच साचून आहे. पुरासोबच हा गाळ पुन्हा नदीपात्रात जमा होणार असल्याने नदी स्वच्छता अभियानावरील केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. शहरातील नाग नदीची लांबी १८ किलोमीटर असून, पिवळी नदी १९ तर पोहरा नदीची लांबी १० किलोमीटर आहे. अशा एकूण ४७ किलोमीटर लांबीच्या नदीपात्रातील तसेच २२६ नाल्यातील गाळ काढून त्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी स्वच्छता अभियान राबविणाऱ्या अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु गाळ व कचरा अनेक ठिकाणी तसाच पडून असल्याचे ‘लोकमत’ चमूच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी निदर्शनास आले. तीन प्रमुख नद्यातील गाळ व कचरा नदीपात्रात किनाऱ्यालगत अथवा काठावर जमा करण्यात आलेला आहे.काही ठिकाणचा गाळ दुसरीकडे नेण्यात आला. परंतु अनेक ठिकाणी अद्याप तो तसाच पडून आहे. याही वर्षी मे महिन्यात मोठा गाजावाजा करून शहरातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख तीन नद्या व सर्व नाल्यांची ५ जूनपर्यंत सफाई करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. मात्र जून महिना अर्धाअधिक संपत आला असताना अद्याप नालेसफाईचे काम सुरूच आहे. १७ जूनला झालेल्या पहिल्याच पावसाने काठावर साचविलेला गाळ वाहूननदीपात्रात पुन्हा साचल्याचे दिसून आले.शहराच्या मध्यभागी असलेल्या धंतोली पोलीस स्टेशनजवळ आणि मोक्षधाम घाटाजवळ मोठ्या प्रमाणात गाळ काठावर जमा करून ठेवला आहे. पुढे नंदनवन झोपडपट्टीपर्यंत कचरा नदीबाहेर काढण्यात आला नाही. भिंतीला लागूनच जमा करून ठेवला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतेक कचरा पहिल्याच पावसात पुन्हा नाल्याच्या प्रवाहाला लागला आहे. नागनदी काठावर असलेल्या सोनिया गांधीनगर, नंदनवन झोपडपट्टी व इतर वस्त्यांमध्ये मागील वर्षी पुराने थैमान घातले होते.दरवषीं कोट्यवधीचा खर्चदरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले स्वच्छ केले जातात २५ ते ३० लाखांचा खर्च करण्यात येतो. यावर्षी हा खर्च दुपटीवर गेला आहे. नद्या स्वच्छता अभियानावर ३० ते ४० दिवस महापालिकेचे कर्मचारी काम करतात. त्यांचे वेतन व स्वच्छता अभियानावरील खर्च असा हा आकडा कोटीच्या घरात जातो. थेट महापालिकेच्या तिजोरीतून हा पैसा खर्च होत नसल्याचा दावा केला जात असला तरी शासनाच्या इतर विभागामार्फत हा खर्च करण्यात येतो. नद्यात पुन्हा गाळ साचणार नाही. याचे नियोजन नसल्याने हा पैसा पाण्यात जातो.