शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कलह पसरविणाऱ्यांना समाजच सरळ करेल : सरसंघचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 23:54 IST

कलह पसरविणाऱ्या तत्त्वांना जग व समाज ओळखेल आणि त्यांना दूर करेल. त्यांच्यातील कटुता व वाकडेपणा समाजाला बदलू शकत नाही. परंतु समाज एकत्रित येऊन अशा तत्त्वांना सरळ करु शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले.

ठळक मुद्देराजकारणाच्या माध्यमातून लोकांना चिथवले जाते

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आपल्या देशातील काही तत्त्वांमुळे अस्वस्थ वाटत असल्याचे लोक म्हणतात. परंतु त्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. विद्येमुळे समाजात सकारात्मक वाढते. जर विद्येचा योग्य उपयोग झाला कलह पसरविणाऱ्या तत्त्वांना जग व समाज ओळखेल आणि त्यांना दूर करेल. त्यांच्यातील कटुता व वाकडेपणा समाजाला बदलू शकत नाही. परंतु समाज एकत्रित येऊन अशा तत्त्वांना सरळ करु शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. श्री नागपूर गुजराती मंडळद्वारा संचालित व्हीएमव्ही कॉमर्स, जेएमटी आर्ट्स अ‍ॅण्ड जेजेपी सायन्स कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारोपीय सोहळ्याप्रसंगी ते गुरुवारी बोलत होते.महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाला श्री नागपूर गुजराती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रकांत ठाकर, श्री नागपूर गुजराती मंडळाचे अध्यक्ष योगेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य के. पी. कारिया, संघाचे महानगर संघचालक राजेश लोया प्रामुख्याने उपस्थित होते.ब्रिटिशांच्या काळापासून देशाने अनुभव घेतला आहे की राजकारणाच्या माध्यमातून लोकांना कायम चिथावणी दिली जाते. प्रत्यक्षात वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची स्वत:ची काहीच शक्ती नसते. परंतु समाजात कर्तृत्व, सक्रियता व सकारात्मकतेच्या प्रकाशाचा अभाव असतो व त्यामुळे लोकांना देशात अंधकारमय वातावरण असल्याचे वाटते. आपल्या देशात विविधतेत एकता नव्हे तर एकतेची विविधता आहे. सर्व वैविध्यांचा स्वीकार केला तर आपलेपणाच्या भावनेतून हा अंधकारदेखील दूर होतो, असे डॉ.मोहन भागवत म्हणाले. आपली संस्कृती ही स्वार्थाची नसून आपुलकीची आहे. स्वार्थ आणि दरी निर्माण करणाऱ्या तत्त्वांना जवळ करण्याऐवजी प्रेमाचा स्वीकार करायला हवा, असेदेखील ते म्हणाले. चंद्रकांत ठाकर यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन व देशभावना डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याचे आवाहन केले. के.पी.कारिया यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.सोनू जेसवानी यांनी संचालन केले. 

राजकारण म्हणजे धोक्याची घंटाचराजकारणात धोक्याची घंटा वाजते. कारण राजकारण म्हटले की स्वार्थ येतो. अनेकदा प्रेम व आपुलकी दूर करणारा स्वार्थ निर्माण होतो. स्वार्थ आला की प्रेम काम करत नाही, असे सरसंघचालक म्हणाले.शैक्षणिक संस्थांत आपलेपणा टिकावाकुठलीही विद्या घेत असताना त्याचा उद्देश काय याचा विचार व्हायला हवा. जगासाठी विद्याचे उद्देश सुख आहे. परंतु आत्मिक समाधान जास्त महत्त्वाचे असते. जर आपलेपणाच टिकला नाही तर ज्ञानाचा योग्य उपयोग होत नाही. मग विद्या असणारे लोक विवादांमध्ये जास्त रस घेतात. विद्येचा उपदेश वाद नव्हे तर सर्वांना आपले करणे हा असला पाहिजे. विशेष म्हणजे शैक्षणिक संस्थांत आपलेपणाचा व्यवहार झाला पाहिजे असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे ‘जेएनयू’तील वादांवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ