शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निराधार रुग्णासाठी धावून आले समाजसेवक; सेवा फाऊंडेशन दिले इम्प्लांट

By सुमेध वाघमार | Updated: April 1, 2024 19:30 IST

कॉटन मार्केट येथील हनुमान मंदिरात गेल्या दहा ते बारा वर्षांपासून एक निराधार वृद्ध व्यक्ती राहत होते. १० फेब्रुवारी रोजी मंदिरात काही गुंड शिरले.

सुमेध वाघमारे नागपूर : गरीब रुग्णांसाठी शासनाच्या विविध योजना असल्यातरी त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची गरज असते. मात्र निराधार रुग्णांकडे हे कागदपत्रही राहत नसल्याने शासकीय रुग्णालयांंना उपचारच नाही तर इतर सोयी देणेही अवघड जाते. अश्यावेळी वैद्यकीय सामाजिक अधीक्षकांनी केलेली मदतच त्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरते. नुकतेच एका वयोवृद्ध व निराधार रुग्णसाठी सामाजिक अधीक्षकांसह काही सामाजिक संघटना धाऊन आल्याने वेळीच उपचार झाले, सोबतच त्यांचा निवासाचीही सोय सुद्धा झाली. 

    कॉटन मार्केट येथील हनुमान मंदिरात गेल्या दहा ते बारा वर्षांपासून एक निराधार वृद्ध व्यक्ती राहत होते. १० फेब्रुवारी रोजी मंदिरात काही गुंड शिरले. त्यांनी त्या वृद्धाला पैशासाठी मारहाण केली. त्यांच्या जवळ जे काही होते ते हिसकावून पळून गेले. या मारहाणीत वृद्धाचा एक हात व दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. पोलिसांनी अशा अवस्थेत त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोन्ही पाय व एका हातावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. परंतु हाड जोडण्यासाठी ‘इम्प्लांट’ची गरज होती. वृद्धाकडे कुठलेच ओळखपत्र, राशन कार्ड नव्हते. त्यामुळे महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून मदत मिळणे शक्य नव्हते. मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी ही माहिती  समाजसेवा अधीक्षक नरेश नासरे यांना देऊन मदत करण्याचा सूचना केल्या.

नासरे यांनी वृद्धाच्या खर्चाच्या व्यवस्थेसाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्याचे ठरवले. सेवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला याची माहिती दिली. त्यांनी लागलीच ‘इम्प्लांट’ उपलब्ध करून दिले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. परंतु वृद्धाला उभे राहण्यास आणखी काही महिन्याचा कालावधी लागणार असल्याने त्यांच्या पूनर्वसनासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु रुग्ण चालू-फिरू शकत नसल्याने अनेक वृद्धाश्रमाने आपल्याकडे ठेवण्यास नकार दिला. अखेर उमरी पठार तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ येथील संत श्री डोला महाराज वृध्दाश्रमाने रुग्णाला आहे त्या परिस्थितीत स्वीकारण्याची तयारी दर्शवली. परंतु रुग्णाला सोडून देण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय नव्हती. यामुळे पुन्हा सेवा फाउंडेशनला मदत करण्याची विनंती केली. त्यांनी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यानंतर ३० मार्च रोजी वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले.