शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी करणार ‌‘समतेचा जागर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचवण्यासाठी आता समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचवण्यासाठी आता समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. सामाजिक न्याय विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून, शासनाच्या योजनांसोबतच संविधानाबाबत जागृती, व्यसनमुक्ती आणि ॲट्रॉसिटीबाबतही लोकांना जागृत करण्यात येईल. एकप्रकारे हे विद्यार्थी गावागावांत जाऊन समतेचा जागर करतील.

सामाजिक न्यायासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांसोबतच संविधानाबाबत माहिती, व्यसनमुक्ती आणि ॲट्राॅसिटी याबाबतची माहिती दूरवरच्या गावकऱ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेत समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत प्राचार्यस्तरावर चार विषयांच्या चार समित्या तयार करण्यात आल्या. व्यसनमुक्तीसाठी प्रा. गोडघाटे यांच्या नेतृत्वात समिती तयार करण्यात आली. संविधानाच्या माहितीसाठी प्रा. महेंद्रकुमार मेश्राम, ॲट्रॉसिटीसाठी प्रा. पुरुषोत्तम थोटे आणि सामाजिक न्यायाच्या विविध योजनांसाठी निशांत माटे यांच्या नेतृत्वात समिती गठित करण्यात आली. तसेच या चारही समित्यांसोबत समन्वय ठेवण्यासाठी बाबा शंभरकर यांची मुख्य समिती राहील. या समितीद्वारे या कामासाठी प्राध्यापकांची निवड केली जाईल. त्या प्राध्यापकांना उपरोक्त विषयांबाबत तज्ज्ञमंडळींद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर हे प्रशिक्षणप्राप्त प्राध्यापक आपापल्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. त्यानंतर विद्यार्थ्यांचे व्हिलेज कॅम्प आयोजित केले जातील. त्यावेळी गावागावांत जाऊन संविधानाच्या तरतुदी, लोकांचे अधिकार समजावून सांगतील. व्यसनमुक्तीबााबत मार्गदर्शन करतील. तसेच ॲट्रॉसिटी कायदा नेमका काय आहे, हे समाजावून सांगतील. एकप्रकारे या कॅम्पद्वारे गावागावांमध्ये समतेचा जागर होईल.

नागपुरात होणार समतेचा जागर

बॉक्स

समित्या स्थापन, लवकरच प्रशिक्षणालाही सुरुवात

सामाजिक न्याय विभागामार्फत समाजोपयोगी महत्त्वाच्या योजना तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘जागर समतेचा सामाजिक न्यायाचा’ हा कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. यात समाजकार्य महाविद्यालयांच्या मदतीने हा कार्यक्रम राबविला जाईल. समित्या स्थापन झाल्या आहेत. लवकरच प्रशिक्षणालाही सुरुवात होईल. येत्या १९ फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायभवन येथे या कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन होईल. त्यानंतर वर्षभर कार्यक्रम राबविले जातील.

- डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग