शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

-तर मतदार यादीत समावेश नाही : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:07 IST

Voter list, Important decision of the High Court राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकारांतर्गतच्या निवडणुकीसाठी ठरवून दिलेल्या मतदार यादीमध्ये अंतिम तारखेनंतर कुणाचाही समावेश करता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी एका प्रकरणात दिला.

लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकारांतर्गतच्या निवडणुकीसाठी ठरवून दिलेल्या मतदार यादीमध्ये अंतिम तारखेनंतर कुणाचाही समावेश करता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी एका प्रकरणात दिला.

राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २५ सप्टेंबर २०२० ही अंतिम तारीख निश्चित करून मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या मतदार यादीमध्ये फिरोज खान पठाण यांचा समावेश नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदी व मतदार नोंदणी नियमांकडे न्यायालयाचे लक्ष वेधून २५ सप्टेंबर २०२० रोजी अंतिम केलेल्या मतदार यादीमध्ये खान यांचा समावेश केला जाऊ शकत नसल्याचे सांगितले. राज्य निवडणूक आयोग त्यांच्या अधिकारांतर्गतच्या निवडणुकीसाठी स्वत: मतदार यादी तयार करीत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीकरिता भारतीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा मतदार संघाची यादी मागवली जाते. गोंडपिपरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २५ सप्टेंबर २०२० पर्यंतची मतदार यादी मागवून ती अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे त्या मतदार यादीमध्ये समावेश नसलेल्या व्यक्तींना निवडणुकीत मतदान करता येणार नाही. तसेच, या मतदार यादीमध्ये नवीन व्यक्तीचा समावेशही केला जाऊ शकत नाही अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. न्यायालयाने हे मुद्दे विचारात घेता खान यांची याचिका फेटाळून लावली. निवडणूक आयोगातर्फे ॲड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयVotingमतदान