शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...तर न थांबता निश्चित होणार लांब प्रवास

By admin | Updated: February 27, 2015 02:05 IST

रेल्वे गाड्यांच्या प्रवासदरम्यान येणाऱ्या अडचणींना संपविण्यावर जोर देण्यात आला आहे. उत्पन्न वाढल्यास आरओबी व आरयुबीच्या माध्यमातून ....

नागपूर : रेल्वे गाड्यांच्या प्रवासदरम्यान येणाऱ्या अडचणींना संपविण्यावर जोर देण्यात आला आहे. उत्पन्न वाढल्यास आरओबी व आरयुबीच्या माध्यमातून लेव्हल क्रॉसिंग फाटकांवर लागलेले कॉशन आॅर्डर समाप्त केले जातील. मध्य रेल्वे नागपूर मंडळात एकूण ४० मानवरहित रेल्वे फाटक होते. यापैकी २५ फाटक बंद करण्यात आले आहेत. याशिवाय एप्रिल महिन्यात आणखी ७ फाटक बंद करण्याची योजना आहे. अशा फाटकांवर ‘अलार्म सिस्टीम’ लावण्याचा प्रस्ताव आहे. कर्मचारी तैनात असलेल्या रेल्वे फाटकांची संख्या २६८ आहे. यापैकी केवळ १० फाटकांनाच बंद करण्यात यश आले आहे. रेल्वे गाड्यांना विविध स्टेशनवर पाणी भरण्यासाठी थांबविले जाते. ही वेळ वाचवण्यासाठी ‘व्हॅक्युम टॉयलेट’ महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. विमानांच्या धर्तीवर रेल्वेमध्ये लागणाऱ्या या आधुनिक ‘टॉयलेट’मुळे पाण्याचा खर्चसुद्धा कमी होईल. यामुळे गाड्यांना एकाच वेळी पाणी भरून चालवणे शक्य होईल. कॅमेरे लावण्यासाठी आरडीएसओ  ठरविणार दिशानिर्देश महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही रेल्वे गाड्यांमध्ये कॅमेरे लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे यांत्रिक विभागातील अधिकारिक सूत्रांनुसार रेल्वेमंत्र्यांच्या घोषणेनंतर रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टँडर्ड आॅर्गनायजेशन (आरडीएसओ) यासाठी स्पेसिफिकेशन निश्चित करेल. कॅमेरे लावण्यासंबंधी मानक व दिशा निर्देश मिळाल्यानंतरच कॅमेरे लावण्यात येतील.वॉटर कूलर बंद उन्हाळा सुरू होताच रेल्वे प्रवासी स्टेशनवर थंड पाणी शोधत असतात. परंतु नागपूरसारख्या महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकावर वॉटर कुलर मशीन बंद पडल्या आहेत. रेल्वे अर्थसंकल्पात वॉटर वेडिंग मशीनची संख्या वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन बंद पडलेल्या मशीन सुरू झाल्यास अधिक चांगले होईल.         ‘हॅण्ड हेल्ड डिव्हाईस’ आणणार पारदर्शकता रेल्वे गाड्यांमध्ये चालणाऱ्या तिकीट चेकिंग स्टाफला रिझर्व्हेशन चार्टपासून मुक्त करण्यासाठी ‘हॅण्ड हेल्ड डिव्हाईस’उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या मशीनमुळे टीटीईचे काम सोपे होईल. इतकेच नव्हे तर या कामात पारदर्शकता सुद्धा येईल.