शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या वेदनांवर मायेचे ‘स्नेहांचल’

By admin | Updated: May 14, 2017 02:10 IST

मृत्यू जसे सत्य आहे तसे शाश्वतही. तो येणार हे निश्चित असले तरी कधी येणार हे अनिश्चित असल्याने मृत्यूचे भय कायम डोक्यावर असते

मातृत्वाचा अनोखा आदर्श : रुग्णांमध्ये पेरतात मृत्यूला हसत सामोरे जाण्याचा आत्मविश्वास शफी पठाण। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मृत्यू जसे सत्य आहे तसे शाश्वतही. तो येणार हे निश्चित असले तरी कधी येणार हे अनिश्चित असल्याने मृत्यूचे भय कायम डोक्यावर असते मानवाच्या. परंतु कॅन्सरसारख्या आजाराने मृत्यू आणि आपल्यातील अंतर आधीच कळले असेल तर? ... तर मात्र प्रत्येक क्षणाला मरत असतो माणूस आणि प्रत्येक क्षणाचा मृत्यू प्रचंड वेदना देणारा ठरतो. अशावेळी आठवतात आप्त आणि सर्वात जास्त आई. मृत्यू समोर असताना आईची आठवण व्याकुळ करते आणि वेदना आणखी गहिऱ्या होत जातात. अशावेळी या वेदनांना हरवून मृत्यूला हसत सामोरे जाण्याचा आत्मविश्वास रुग्णात निर्माण करण्यासाठी धडपडत असतात ‘स्नेहांचल’मधील नर्सच्या रूपातील माता. इमामवाड्यातील स्नेहांचल हॉस्पिस अ‍ॅण्ड पॉलिएटिव्ह केअर सेंटर ही संस्था ११ वर्षांपासून मृत्यूच्या वेदनांवर असे मायेचे ‘स्नेहांचल’ अखंड धरून आहे. डॉक्टरांनी हात वर केले की रुग्णाला येथे आणले जाते. या रुग्णांचे नातेवाईक गरीब असतात, असले-नसले सारे पैसे आजारावर खर्च झालेले असतात. आता केवळ मृत्यूची प्रतीक्षा असते. परंतु तीही प्रचंड खर्चिक़ कारण रोज ड्रेसिंग, औषधे लागतातच. ती व्यवस्था ‘स्नेहांचल’ करते. येथे सध्या सात रुग्ण आहेत. यातले बहुतेक ओरल कॅन्सरने ग्रस्त आहेत. जखमेवर ताण आला की रुग्ण ‘आई गं’ म्हणून ओरडतो आणि ‘स्नेहांचल’च्या परिचारिका लगेच त्याला आईच्या ममतेने जवळ घेतात, भळभळणारे रक्त पुसतात, शांत झोप यावी म्हणून प्रेमाने अंगाईही गातात. या रुग्णांची आंघोळ, वेळेच्यावेळी औषधे तर या परिचारिका देतातच शिवाय त्यांना उद्यानात आणून निसर्ग नव्याने दाखवतात, त्या निसर्गात एक दिवस सर्वांनाच विलीन व्हायचे आहे, कुणी आधी जाईल, कुणी नंतर इतकाच काय तो फरक. मृत्यू हा सोहळा आहे मुक्तीचा, त्या सृष्टीनिर्मात्याशी प्रत्यक्ष मिलनाचा. त्यामुळे तो येईल तेव्हा हसत सामोरे जाऊ त्याला, हे सकारात्मक विचार रुजवतात त्या रुग्णाच्या मनात आणि एक दिवस खरेच तो येतो, रुग्णाला सोबत नेतो तेव्हा रुग्णाशी हळवे ऋणानुबंध जुळलेल्या या मातृहृदयी अश्रुंचा पाऊस पडत असतो. आजच्या मातृदिनी त्यांच्या या सेवेला त्रिवार सलाम.