शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

एसएनडीएलच्या कॅशियरने घेतला गळफास

By admin | Updated: February 23, 2017 02:13 IST

एसएनडीएलच्या कॅशियरने गणेशपेठ येथील कार्यालयातच गळफास घेतला. या घटनेमुळे एसएनडीएल

कार्यालयातील घटना : कर्मचाऱ्यांत खळबळ नागपूर : एसएनडीएलच्या कॅशियरने गणेशपेठ येथील कार्यालयातच गळफास घेतला. या घटनेमुळे एसएनडीएल कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. अजय मधुकर देशमुख (४६) रा. अयोध्यानगर असे मृताचे नाव आहे. देशमुख यांची सात-आठ महिन्यांपूर्वी सावनेर येथे बदली झाली होती. ते पूर्वी गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानक येथील कार्यालयात तैनात होते. कामानिमित्त ते येथे कधी-कधी यायचे. मंगळवारी सुद्धा ते आले होते. मतदानासाठी सुटी असल्याने कार्यालय बंद होते. केवळ सुरक्षा कर्मचारी गणेश तुमडाम ड्युटीवर हजर होते. गणेशसोबत चर्चा करून देशमुख कार्यालयात गेले. या दरम्यान दोन वेळा ते गणेशजवळ बोलायला आले सुद्धा. रात्री १०.१५ वाजता गणेश कार्यालयात गेला असता देशमुख फासावर लटकलेले आढळून आले. त्याने त्यांना लगेच फासावरून उतरविले. अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. अधिकारी आल्यावर गणेशपेठ पोलिसांना बोलावण्यात आले. पीएसआय पी.ए. आत्राम तिथे पोहोचले. पोलिसांना देशमुख यांच्या खिशात त्यांनी मोबाईलवर टाईप केलेला संदेश सापडला. त्यात देशमुख यांनी चांगले वडील. पती आणि मित्र होऊ न शकल्याची खंत व्यक्त करीत आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी मॅसेजमध्ये ‘मला माफ करा माझ्या कुटुंबाला सांभाळून घ्या, असेही लिहिले आहे. गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.(प्रतिनिधी)