शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील थकबाकीदार नगरसेवकांवर एसएनडीएलची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:06 IST

वीज बिलाच्या थकबाकीदार नगरसेवकांविरुद्ध वीज वितरण फ्रेन्चाईसी एसएनडीएलने बुधवारी कारवाई करून त्यांचे वीज कनेक्शन कापले.

ठळक मुद्देनऊ जणांनी भरले बिलकाँग्रेस नगरसेवकाच्या घरी एसएनडीएल कर्मचाऱ्यावर हल्ला

ऑनलाईन लोकमतनागपूर : वीज बिलाच्या थकबाकीदार नगरसेवकांविरुद्ध वीज वितरण फ्रेन्चाईसी एसएनडीएलने बुधवारी कारवाई करून त्यांचे वीज कनेक्शन कापले. नऊ नगरसेवकांनी कारवाईच्या भीतीने थकबाकी भरली. युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक बंटी शेळकेच्या घरी त्यांचे वडील बाबा शेळके यांनी एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे कारवाईने हिंसक वळण घेतले.मागील काही दिवसांपासून एसएनडीएल आणि नगरसेवकांमध्ये वीज बिलावरुन वाद सुरू आहे. थकबाकीदार नगरसेवकांची नावे जाहीर केल्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी एसएनडीएलच्या छापरुनगर कार्यालयावर मोर्चा काढला होता. दरम्यान तोडफोड झाल्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला. एसएनडीएलच्या तक्रारीवरून पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान महावितरणने एसएनडीएलला नोटीस जारी करून कंपनीवर ९० कोटींची थकबाकी असल्याचे सांगितले. चालू महिन्याचे ४५ कोटी आणखी वाढणार आहेत. नोटीसमध्ये कंपनीला त्वरित थकबाकी भरण्यास सांगण्यात आले आहे. नोटीसनंतर एसएनडीएलने नागरिकांकडून थकबाकी वसुली सुरू करून नगरसेवकांच्या घरी कर्मचारी वसुलीसाठी पाठविले.कर्मचाऱ्यांवर हल्लानवी शुक्रवारीत एसएनडीएलची चमू नगरसेवक बंटी शेळके यांच्या घरी गेली तेंव्हा वाद निर्माण झाला. कंपनीच्या चमूने विद्युत खांबापासून वीज कापली. यावर बंटीचे वडील बाबा शेळके यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना चापट मारली. परंतु चमूने वीज कनेक्शन जोडले नाही. एसएनडीएलने पोलिसात तक्रार नोंदविली. बंटी शेळकेवर २ लाख ५६ हजार रुपये थकबाकी आहे. कॉंग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घरी कुठलाही वाद न होता कारवाई करण्यात आली. सुषमा चौधरी यांनी त्यांचे मीटर वेगाने फिरत असल्याची तक्रार केल्यामुळे दुसरे मीटर लावून तपासणी करण्यात आली. चौधरी यांनी गुरुवारी चेक देण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्यांचे कनेक्शन कापले नाही.एसएनडीएल कार्यालयात स्मशान शांततानगरसेवकांवर कारवाई करण्यात आल्यामुळे एसएनडीएलच्या छापरुनगर कार्यालयात स्मशान शांतता पसरली. कार्यालयावर मोठा मोर्चा येणार असल्याची शंका असल्यामुळे अधिकारी आधीच सतर्क झाले. कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना दुपारीच सुटी देण्यात आली. यामुळे कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले. परंतु कुणीच विरोध करण्यासाठी न आल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण