शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

साबरमतीच्या धर्तीवर नाग नदीचे पुनरुज्जीवन

By admin | Updated: June 1, 2016 03:08 IST

नागपूर शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या नाग नदीत सिवरेज व सांडपाणी सोडण्यासोबतच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. यामुळे नदी प्रदूषित झाली आहे.

प्रकल्पाचे सादरीक रण : एक हजार कोटींचा प्रकल्पनागपूर : नागपूर शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या नाग नदीत सिवरेज व सांडपाणी सोडण्यासोबतच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. या नदीला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एक हजार कोटींचा पुनरुज्जीवन प्रकल्प राबविला जाणार आहे. गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर नाग नदीचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. मंगळवारी महाल येथील महापालिकेच्या राजे रघुजी भोसले सभागृहात आयोजित कार्यशाळेत या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. गतकाळात नाग नदीच्या पाण्याचा वापर केला जात होता. परंतु वाढत्या लोकसंख्येसाबतच नदीपात्रात सिवरेज व सांडपाणी सोडले जात असल्याने या नदीला बकाल स्वरूप आले आहे. नदीची शहरातील लांबी १७ किलोमीटर आहे. प्रवाह शुद्ध करण्यासाठी नदीच्या दोन्ही काठावर सिवरेज लाईन टाकून त्यावर ठिकठिकाणी छोटे-छोटे मलनिस्सारण प्रकल्प उभारले जाणार आहेत. दूषित पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते नदीपात्रात सोडले जाणार आहे. नदीला संरक्षक भिंत, आवश्यक असलेल्या ठिकाणी रस्ते, हिरवळ व वृक्षारोपण केले जाणार आहे. तसेच ज्या ठिकाणी नदीचे पात्र विस्तीर्ण आहे अशा ठिकाणी उद्यान निर्माण केले जाणार आहे. नदीकाठावर वृक्षारोपण करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कार्यशाळेत सादर केला.नाग नदीप्रमाणेच शहरातील पिवळी नदी व पोहरा नदीची अवस्था टप्प्याटप्प्याने या नद्यांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. मान्स्ूानपूर्व तयारी म्हणून शहरातील प्रमुख या नद्यातील कचरा व गाळ काढण्यासाठी महापालिका नद्या स्वच्छता अभियान हाती घेत आहे. यासोबत ठिकठिकाणी दूषित पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे.नाग नदीचा प्रवाह प्रदूषित झाल्याने पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीलगतच्या परिसरातील जलस्रोत प्रदूषित झालेले आहे. यामुळे शहराबाहेर नदीकिनाऱ्यावरील गावातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कार्यशाळेला महापौर प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, फ्रान्सच्या शिष्टमंडळातील सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)