शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एसएमएस’ने तुटली लग्नगाठ

By admin | Updated: February 27, 2015 01:56 IST

केवळ एका एसएमएसमुळे एका तरुणीचे नववधू होण्याचे स्वप्न भंगले. वराने पाठ फिरवली. तो लग्नमंडपी पोहोचलाच नाही.

नागपूर : केवळ एका एसएमएसमुळे एका तरुणीचे नववधू होण्याचे स्वप्न भंगले. वराने पाठ फिरवली. तो लग्नमंडपी पोहोचलाच नाही. मात्र वर-वधूकडील वऱ्हाडी सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहोचल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. सीताबर्डी येथील या तरुणीचा विवाह सारनी, मध्यप्रदेश येथील रहिवासी अभिषेक याच्याशी जुळला होता. आज गुरुवारी हे लग्न मोठ्या थाटात पार पडणार होते. वधू पक्षाच्या माहितीनुसार वर पक्षाकडून लग्नघडीपर्यंत हुंड्याची मागणी होतच होती. वधूचे नातेवाईक भोपाळ येथे कपडे खरेदीसाठी गेले असता, अभिषेक नाराज होता. वधूच्या काका-काकूने त्याला नाराजीचे कारण विचारले असता, त्याने कारची मागणी व लग्नात नातेवाईकांचे थाटात स्वागत झाले पाहिजे, अशी मागणी केली होती. या तरुणीच्या नातेवाईकांनी स्वागतात कुठलीही कसर सोडली जाणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र कार देण्यास असमर्थता दर्शविली होती. २५ जानेवारीला त्यांचे साक्षगंध झाले होते. त्यानंतर अभिषेक व या तरुणीची दररोज बातचित होत होती. दरम्यान अभिषेक १५ फेब्रुवारीला नागपुरात आला होता. अभिषेकने तिला एका हॉटेलात बोलावून राहुल नावाच्या युवकाचा एसएमएस आल्याची माहिती दिली. अभिषेकच्या सांगण्यानुसार राहुलने पाठविलेल्या एसएमएसमध्ये या तरुणीचे आणि त्याचे प्रेमसंबंध असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतरही अभिषेकने तिच्यावर कुठलेही आरोप न करता विवाहाला अनुमती दर्शविली होती. मात्र लग्नाच्या तारखेच्या चार दिवसापूर्वी २२ फेब्रुवारीला अभिषेकच्या वडिलांचा फोन या तरुणीच्या नातेवाईकांना आला. त्यांनी २३ ला चर्चेसाठी बोलाविले. तिथे एसएमएसवर चर्चा झाली. त्यावेळी या तरुणीच्या घरच्यांनी अभिषेकच्या कुटुंबीयांचा गैरसमज दूर केला. या तरुणीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्यानंतर त्यांनी हुंड्यात कारची मागणी केली होती. या तरुणीच्या म्हणण्यानुसार तिची याप्रकरणात कुठलीही चूक नाही. अभिषेकचा गैरसमज दूर करण्यासाठी एसएमएस मागील खरे खोटे उघड करण्यासाठी सीताबर्डी ठाण्यात लिखित तक्रार केली होती. (प्रतिनिधी)