शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती इराणी यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

By admin | Updated: August 27, 2015 02:43 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.

तासभर झाली चर्चा : गोपनीय ठेवला दौरानागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. सुमारे तासभर दोघांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्री असूनही कोणताही लवाजमा सोबत न घेता अतिशय गुपचूपपणे इराणी नागपूरला आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या या भेटीचे गूढ अधिक वाढले आहे.स्मृती इराणी सकाळच्या सुमारास नागपुरात आल्या. विमानतळाहून त्यांनी थेट संघ मुख्यालयच गाठले. मुख्यालयात आल्यानंतर त्या थेट सरसंघचालकांना भेटण्यासाठीच गेल्या. मुख्यालयातील अनेकांना त्या आल्या आहेत याची माहिती नव्हती. सकाळी १० ते ११ या कालावधीत दोघांमध्ये चर्चा झाली व ११.१५ च्या सुमारास त्या विमानतळाकडे निघून गेल्या. दुपारी १२.५० च्या विमानाने त्या दिल्लीकडे रवाना झाल्या. (प्रतिनिधी)दौऱ्यामुळे तर्कवितर्कांना उधाणसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी यांच्यावर विरोधकांनी सातत्याने टीका केली आहे. या टीकेला कामातून उत्तर देण्यात यावे, असा सल्ला सरसंघचालकांनी त्यांना दिला. शिवाय संस्कृत भारतीतर्फे संस्कृतच्या प्रसारासाठी राबविण्यात येणारी मोहीम, पारंपरिक मूल्यांचा शिक्षण प्रणालीत समावेश होण्याची आवश्यकता यावर या भेटीत चर्चा झाली. परंतु भेटीत राजकीय मुद्दे व भाजपाच्या अंतर्गत राजकारणाबाबत काय चर्चा झाली, याबाबत सरसंघचालकांच्या निकटवर्तीयांना माहिती नाही. संघातर्फे याबाबत मौन साधण्यात आले आहे. स्मृती इराणी यांनी हा दौरा अतिशय गुप्त ठेवला होता. फारशी सुरक्षा व्यवस्था त्यांच्यासोबत नव्हती. अचानकपणे त्यांनी सरसंघचालकांची भेट घेण्याचे कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.