शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

स्मृतिदिन: आई, ताजबाग अन् कवी ग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 09:38 IST

ओल्या वेळूची बासरी, कावळे उडाले स्वामी, चंद्रमाधवीचे प्रदेश, चर्चबेल, मितवा, वाऱ्याने हलते रान, सांध्यपर्वातील वैष्णवीच्या पानापानातून ग्रेस जगताहेत. जगतच राहणार आहेत...

ठळक मुद्देलोभानभरल्या वाऱ्यात शोधायचे मातृगंध

शफी पठाण।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शीर्षकातील आर्ई आणि ग्रेस हे शब्द वाचकांना नवीन नाहीत. ‘ती गेली तेव्हा...’ ही कविता लिहून स्वत: ग्रेसांनीच या दोन शब्दांमधील एकरूपता स्वहस्ताक्षरात नमूद करून ठेवली आहे. पण, या दोन शब्दांमध्ये ‘ताजबाग’ कसे आले हा प्रश्न मात्र वाचकांना अस्वस्थ करू शकतो. पण, आई इतकेच ताजबागही ग्रेसांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होते. ही अविभाज्यता इतकी की आई गेल्यावर ताजबागमधल्या लोभानभरल्या वाऱ्यात त्यांना आईचा गंध जाणवायचा. म्हणूनच तर ‘दुर्बोधतेची बेसरबिंदी’ अभिमानाने ललाटावर मिरवणारा हा शब्दसखा दर गुरुवारी सकाळी न चुकता ताजबागला जायचा आणि आईच्या अस्तित्वाचे आभासी क्षण आेंजळीत साठवून पुन्हा धंतोलीतील आपल्या गूढ गुहेत परतायचा. या संध्यामग्न पुरुषाच्या कवितेची प्रेरणा ही अशी सकाळच्या ताजबाग भेटीत दडलेली असायची. काही लोक या भेटीकडे धार्मिक चष्म्यातून बघायचे आणि दबक्या आवाजात टीकाही करायचे. कारण, त्यांना दिसायचे फक्त ताजबाग. त्या दर्ग्याआडून ग्रेसांना खुणावणारी आई त्यांना दिसायचीच नाही. म्हणूनच ग्रेसांचे हे ताजबागप्रेम आजही गे्रसांइतकेच दुर्बोध बनून राहिले आहे. पण, ग्रेस उगाच ताजबागला जात नव्हते. त्याचीही एक रंजक कथा आहे. ग्रेसांचे कुटुंब कर्नलबागेत राहायचे. हजरत बाबा ताजुद्दीन जिवंत असतानाचा हा काळ होता. ग्रेसांची आई बाबांच्या दर्शनाला गेली असता बाबांनी तिच्या अंगावर त्यांच्या शेजारी पडलेला झब्बा फेकला होता. तो झब्बा त्यांच्या आईने प्रसादाच्या रूपात स्वीकारून घरी आणला आणि त्या कायमच्या ताजभक्त झाल्या. काळाने कूस बदलली आणि ग्रेसांची आई ढगाआड निघून गेली. ग्रेस मात्र नित्यनेमाने ताजबागला जात राहिले, आई शोेधत राहिले आणि दरवेळी तिच्या कुशीची ऊब मिळाल्यागत आनंदाने आत्म्यावरची धूळ झटकून आपल्या कवितेद्वारे प्रतिभा-रूपाचा नित्यनवा साक्षात्कार घडवित राहिले. पण, २६ मार्च, २०१२ साली साक्षात्काराची ही मालिका थांबली. शब्दकोषांना नवे शब्द देणारा शब्दप्रभूही आईच्या शोधात ढगाआड निघून गेला. पण, ग्रेस नेहमी म्हणायचे वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. बघा...नियतीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. ओल्या वेळूची बासरी,कावळे उडाले स्वामी ,चंद्रमाधवीचे प्रदेश, चर्चबेल, मितवा, वाऱ्याने हलते रान, सांध्यपर्वातील वैष्णवीच्या पानापानातून ग्रेस  जगताहेत. जगतच राहणार आहेत...

 

 

 

टॅग्स :literatureसाहित्यTajbagh Dargah, bigताजाबाद दर्गा (मोठा)