दिवस थंडीचे आहेत. त्यामुळे खूप थंडीने वातावरणात धुके पसरले असावे, असेच कुणालाही वाटणार. ते स्वाभाविकच आहे. पण हे सत्य नाही. हा भांडेवाडी परिसरातील धूर आहे. भांडेवाडीत कचरा जाळण्यात येणार नाही, असे प्रशासन ठणकावून सांगत असले तरी गेल्या काही दिवसांपासून दररोज कचरा जाळण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांना या धुराचा सामना करावा लागतो. यामुळे वातावरण प्रदूषित झाले असून थंडीमुळे हा धूर रस्त्यावर जमून राहतो. नागरिकांना कचऱ्याच्या धुरामुळे मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांचे आरोग्यही यामुळे धोक्यात आले असल्याचा हा पुरावाच आहे.
धुके नव्हे धूर :
By admin | Updated: December 4, 2014 00:46 IST