शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

तासभर धुव्वाधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:38 IST

गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू असतानाच रविवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह शहरात जोरदार पाऊ स पडला.

ठळक मुद्देझाडे पडली;पाणी तुंबले : आणखी बरसणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू असतानाच रविवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह शहरात जोरदार पाऊ स पडला. काही ठिकाणी पाणी तुंबले. ठिकठिकाणी झाडे पडली. पावसामुळे गणेश भक्तांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र हवामान विभागाकडे रविवारी रात्री ८ पर्यत ९.४ मि.मी. पावसाचीच नोंद करण्यात आली आहे. राजभवन पाण्याच्या टाकीजवळ व जरीपटका येथील दयालू सोसायटी व महाल भागातील चिटणवीस पार्क जवळील रिसालदार गल्ली आदी ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या.जोराच्या पावसामुळे सदर, काँटन मार्केट चौक, बसस्थानक, मेडिकल चौक, जरीपटका, जयताळा आदी भागातील रस्त्यांवर काहीवेळ पाणी साचले होते.झिंगाबाई टाकळी भागातील बाबा फरीदनगर येथील खोब्रागडे यांच्या घरात पाणी शिरले होते. अग्निशमन विभागाच्या जवानांनी खोब्रागडे यांच्या घरात साचलेले पाणी बाहेर काढले. शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. परंतु पाऊ स थांबल्याने साचलेले पाणी वाहून गेल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. रहदारीला फारसा अडथळा झाला नाही. मात्र काहीवेळ रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ठिकठिकाणी किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या. गणेशोत्सव व रविवार असल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी होती. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ४८ तासात नागपूर शहर व परिसरात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.