शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात स्पाईस जेट विमानाच्या कॉकपिटमध्ये धूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:57 IST

कॉकपिटमधून अचानक धूर निघू लागल्यामुळे स्पाईस जेट विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी दुपारी २.०५ आकस्मिक लँडिंग करण्यात आले. वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे सर्व प्रवाशांचे जीव वाचले.

ठळक मुद्देवैमानिकाची समयसूचकताजीवहानी टळलीआकस्मिक लँडिंग

ऑनलाईन लोकमतनागपूर : कॉकपिटमधून अचानक धूर निघू लागल्यामुळे स्पाईस जेट विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी दुपारी २.०५ आकस्मिक लँडिंग करण्यात आले. वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे सर्व प्रवाशांचे जीव वाचले.प्राप्त माहितीनुसार, स्पाईस जेटचे ६० ते ७० सीटचे विमान (टर्बो जेट) हैदराबाद येथून जबलपूरला जात आहे. विमानाने उड्डाण भरल्यानंतर काहीच वेळात कॉकपिटमधून धूर येत असल्याचे वैमानिकाच्या ध्यानात आले. धूर विमानात हळूहळू पसरू लागला. वैमानिकाने परिस्थिती पाहून विमान नागपूर विमानतळावर उतरविण्याची परवानगी मागितली. ती त्यांना मिळाली. त्यांनी विमान तातडीने विमानतळावर उतरविले. विमान विमानतळालगतच्या ‘टॅक्सी-वे’वर उभे करण्यात आले. लगेचच विमानाची दारे उघडण्यात आली आणि प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. धुरातून बाहेर निघत प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्याचवेळी अग्निशमन गाड्या ‘टॅक्सी-वे’वर पोहोचल्या. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना विमानातून बाहेर येण्यास मदत केली. सध्या विमान ‘टॅक्सी-वे’वर उभे आहे. रात्रीपर्यंत कंपनीचे इंजिनिअर्स विमानाच्या दुरुस्तीसाठी नागपुरात पोहोचले नाहीत.सर्व प्रवाशांना टर्मिनलमध्ये बसविण्यात आले आणि त्यांना चहा व नाश्ता देण्यात आला. रात्री ८ वाजेपर्यंत प्रवासी बसून होते. प्रवाशांना दुसऱ्या विमानाने जबलपूरला पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :Airportविमानतळ