शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

नागपुरातील तहसील, सोनेगाव आणि यशोधरानगर ठरले स्मार्ट पोलीस ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:46 IST

सद्यस्थितीला उपराजधानीतील सर्वात स्मार्ट तहसील, सोनेगाव आणि यशोधरानगर पोलीस ठाणे आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच शहरातील मान्यवरांच्या समितीने केलेल्या पोलीस ठाण्याच्या सर्वेक्षणातून हा अहवाल तयार झाला असून, तो आज गुरुवारी जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देअनेक ठाण्यांचा चेहरामोहरा बदलला : मूल्यांकन समितीचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सद्यस्थितीला उपराजधानीतील सर्वात स्मार्ट तहसील, सोनेगाव आणि यशोधरानगर पोलीस ठाणे आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच शहरातील मान्यवरांच्या समितीने केलेल्या पोलीस ठाण्याच्या सर्वेक्षणातून हा अहवाल तयार झाला असून, तो आज गुरुवारी जाहीर करण्यात आला. पोलीस उपायुक्त एस. चैतन्य, उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय आणि सहायक आयुक्त रिना जनबंधू यांनी ही माहिती गुरुवारी पत्रकारांना दिली.पोलीस ठाण्यातील अस्तव्यस्त कारभार, तेथील कोंदट वातावरण, रुक्षपणा पाहून कोणत्याच पोलीस ठाण्यात जाण्याची-बसण्याची कुणाची इच्छा होत नव्हती. ते ध्यानात घेत पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी उपराजधानीत स्मार्ट सिटी पोलीस स्टेशन हा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार, प्रत्येक पोलीस ठाण्याचा परिसर अंतर्बाह्य सुंदर, सुशोभित करण्यावर भर देण्यात आला. पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीची रचना बदलून आवश्यक त्याठिकाणी बांधकाम करण्यात आले. स्वागतकक्ष, लॉकअप, स्वच्छतागृह इत्यादी सोयीसुविधा चांगल्या करण्यात आल्या आणि ठाण्याचे आधुनिकीकरणही करण्यात आले. हे करतानाच जे पोलीस स्टेशन सर्वात चांगले त्याला पुरस्कार देण्याची घोषणा आयुक्तांनी केली होती. त्यानुसार शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या आधुनिकीकरण आणि सुशोभिकरणाचे काम सुरू झाले अन् आता या सर्व ठाण्यांचा चेहरामोहरा बदलला. त्याचे मूल्यांकन करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. समितीत वास्तुविशारद तज्ज्ञ, स्मिता गायधने, संजीव शर्मा यांच्यासह अन्य काही सदस्यांचा समावेश होता. सदर मूल्यांकन समितीने शहरातील सर्व पोलीस स्टेशनला पूर्वसूचना न देता अचानक भेटी दिल्या. पोलीस स्टेशनच्या इमारत परिसराचे तसेच तेथील कार्यपद्धतीचे मूल्यांकन करण्यात आले.जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून तयार करण्यात आलेले पोलीस स्टेशन, स्वत:च्या इमारती असणारे पोलीस स्टेशन आणि किरायाच्या इमारतीत असणारे पोलीस स्टेशन अशा तीन प्रकारात विभागणी करून स्मार्ट ठाण्याच्या पुरस्कारासाठी पोलीस स्टेशनची इमारत व रचना, परिसर, कार्यपद्धती तसेच तेथे उपलब्ध भौतिक सोयीसुविधा असे निवडीचे चार निकष लावण्यात आले.या निकषावर समितीने पोलीस स्टेशनचे मूल्यांकन केले. समितीच्या अहवालाप्रमाणे जिल्हा नियोजन व विकास निधीतून तयार केलेले स्मार्ट पोलीस स्टेशनचा प्रथम क्रमांक तहसील ठाण्याने, द्वितीय क्रमांक सक्करदराने मिळवला.शासकीय इमारतीतील स्मार्ट पोलीस स्टेशन गटात प्रथम क्रमांक सोनेगाव, द्वितीय क्रमांक अजनी तर किरायाच्या इमारतीत असणारे स्मार्ट पोलीस स्टेशन प्रथम क्रमांक यशोधरानगर, द्वितीय क्रमांक वाडी ठाण्याला मिळाला.गणराज्यदिनी पुरस्कारनिवड झालेल्या ठाण्याच्या ठाणेदारांना गणराज्यदिनी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन पुरस्कृत केले जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसPolice Stationपोलीस ठाणे