शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट नागपूर, ग्लोबल नागपूर

By admin | Updated: September 21, 2016 02:55 IST

नागपूरकरांसाठी गुडन्यूज आहे. केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात नागपूर शहराचा समावेश करण्यात आला आहे.

नागपूर : नागपूरकरांसाठी गुडन्यूज आहे. केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात नागपूर शहराचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता नागपूरच्या विकासाला अधिक गती मिळणार असून नागपूरचा चेहरामोहरा बदलण्यात मोलाची मदत होणार आहे. पहिल्या यादीत संधी हुकल्यानंतर आता स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या यादीत नागपूरचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत इको सिटी, एज्युुकेशन सिटी व इलेक्ट्रॉनिक्स सिटी (ट्रीपल ई) या संकल्पनेवर नागपूरचा विकास केला जाणार आहे. केंद्र सरकारतर्फे गेल्यावर्षी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या यादीत नागपूरचा ३५ वा क्रमांक होता. यापैकी पहिल्या २० शहरांची निवड प्रकल्पासाठी करण्यात आली होती. यानंतर नव्याने दुसऱ्या टप्प्यातील शहरांची निवड करण्यासाठी सुधारित प्रस्ताव मागविण्यात आले. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आराखड्यासाठी परिश्रम घेतले व नागपूर महापालिकेने जुन्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून शहर विकासाचा समग्र आराखडा सादर केला. शेवटी सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. केंद्रीय नगर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या २७ शहरांच्या यादीत नागपूर पाचव्या क्रमांकावर राहिले. महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या पाच शहरांमध्ये तर नागपूरचा दुसरा क्रमांक लागला. (सविस्तर/२)काय आहे ‘ट्रीपल ई’ ?‘ई-क्यूब’ या संकल्पनेच्या आधारावर स्मार्ट सिटीचा मास्टर प्लान तयार करण्यात आला होता. फ्रान्स येथून आलेल्या चमूच्या मदतीने इको सिटी, एज्युकेशन सिटी व इलेक्ट्रॉनिक्स सिटी (ट्रीपल ई) साठी राबविण्यात येत अलेलेले उपक्रम व भविष्यातील योजनांबाबत उल्लेख करण्यात आला होता. या अंतर्गत इको सिटीसाठी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून नदी, तलावांचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण, एज्युकेशन सिटीसाठी आयआयएम, एम्स सारख्या संस्था सुरू करणे, तसेच इलेक्ट्रानिक्स सिटी अंतर्गत ६ किलो मीटरचा स्मार्ट स्ट्रीट, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय, स्मार्ट पार्किंग आदींचा समावेश करण्यात आला. कचरा उचलून वाहून नेण्यापर्यंतच्या एकूणच प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट व विकसित पद्धतीचाही यात उल्लेख करण्यात आला आहे.