शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आग विझविण्याची यंत्रणा हवी स्मार्ट

By admin | Updated: October 18, 2015 03:14 IST

उपराजधानीची ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या दृष्टीने शहर विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

अत्याधुनिक यंत्रसामुग्री नाही : मनुष्यबळाचीही कमतरता नागपूर : उपराजधानीची ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या दृष्टीने शहर विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु स्मार्ट सिटीचा वाढता पसारा बघता ‘फायर मॅनेजमेंट’साठी आवश्यक असलेली अत्याधुनिक यंत्रणा महापालिकेकडे नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक असलेले मनुष्यबळ नाही. गल्लीबोळातील किंवा बहुमजली इमातीत लागलेली आग असो, अपुऱ्या यंत्रसामुग्रीमुळे ती विझविण्यासाठी अग्निशमन विभागालाच जीवन मरणाची परीक्षा द्यावी लागते, ही वास्तविकता आहे. भविष्यातील अग्नितांडव टाळण्यासाठी अग्निशमन विभागही स्मार्ट करणे आवश्यक आहे. मेट्रो रेल्वे, मिहान यासारख्या प्रकल्पासोबतच शहरात ६५ मीटरहून अधिक उंचीच्या टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागावर मेट्रो रिजनमधील नऊ तालुक्यांची जबाबदारी आहे. सोबतच विभागातील सहा जिल्ह्यांच्या समन्वयाची जबाबदारी आहे.परंतु विभागाकडे सुसज्ज यंत्रणेचा अभाव व मनुष्यबळाची कमतरता असल्याने कार्यक्षमतेवर मर्यादा आल्या आहेत. १९६५ च्या लोकसंख्येच्या आधारावर शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली होती.पाच मिनिटात मदत कशी मिळणार?आग लागल्यास पाच मिनिटात अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहचणे आवश्यक आहे. परंतु पार्किंगचा प्रश्न, शहरातील वाहतुकीचा अडथळा, जुन्या वस्त्यांतील अरुंद रस्ते यामुळे ते शक्य नाही. अशा परिस्थितीत पाच मिनिटात मदत कशी मिळणार असा प्रश्न आहे.