शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिकेच्या विशेष सभेत सायबरटेकला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 21:15 IST

निर्धारित कालावधीत काम पूर्ण न केल्यास सायबरटेक कंपनीला दररोज १० हजार रुपये दंड आकारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. तसेच चुकीचे सर्वे झालेल्या घरांच्या डिमांडमध्ये ५० टक्के कपात करण्याचा निर्णय शनिवारी महापालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देचुकीचा सर्वे केल्यास बिलात ५० टक्के कपातविलंब झाल्या दररोज १० हजार दंडअधिकाऱ्यांवरही कारवाई होणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : सायबरटेक कंपनीने शहरातील मालमत्तांचा चुकीचा  सर्वे केल्याने मालमत्ता करात पाच ते पंचवीस टक्के वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष असल्याने सायबरटेक कंपनीवर गुन्हे दाखल करून कंत्राट रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली. परंतु सत्तापक्षाने कंपनीसंदर्भात मवाळ भूमिका घेत निर्धारित कालावधीत काम पूर्ण न केल्यास सायबरटेक कंपनीला दररोज १० हजार रुपये दंड आकारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. तसेच चुकीचे सर्वे झालेल्या घरांच्या डिमांडमध्ये ५० टक्के कपात करण्याचा निर्णय शनिवारी महापालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला.करवाढीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभागृहात तब्बल साडेचार तास वादळी चर्चा झाली. कर आकारणीच्या नियमात सुधारणा करण्याचा सभागृहात निर्णय होण्यापूर्वीच या निर्णयाची घोषणा करण्यावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. सभागृहात अर्धा तास यावरुन सत्ताधारी व विरोधकात जुगलबंदी सुरू होती. सायबरटेक कंपनीचा सर्वे चुकीचा असल्याने डिमांड रद्द करणार का, असा सवाल काँग्रेसचे संदीप सहारे यांनी उपस्थित केला. यावर प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. परंतु प्रशासनाकडून उत्तर न आल्याने सभागृहात गोंधळ सुरू होता. आयुक्त अश्विन मुदगल यांनी प्रशासनाची भूमिका मांडल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली.सर्वेक्षणानंतर डाटा तपासणीत त्रुटी असल्याने संबंधित सहायक आयुक्त, कर निरीक्षक व निरक्षक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. तसेच कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली.मालमत्ता सर्वेक्षणात त्रुटी असल्याचे विरोधकांसोबतच सत्ताधाऱ्यांनीही मान्य केले. यात सुधारणा करण्याची मागणी केली. त्रुटीसाठी सायबरटेक कंपनीच नाही तर अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी केली. मालमत्ता कर आकारणी संदर्भात सत्ताधारी व विरोधकांनी दिलेल्या सूचना व प्रस्तावांनुसार सुधारणा करून कर आकारणी करण्यात यावी. कंपनीची चूक असल्यास दंड आकारण्यात यावा, असे निर्देश महापौरांनी दिले.भाडेकरू संदर्भातील निकषात बदल करण्यात आल्याने शहरातील दीड लाख नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. सायबरटेक कंपनीला सर्वेचे काम दिले आहे. कर निर्धारणाचे अधिकार दिलेले नाही. कर आकारणीला सहायक आयुक्त व कर विभागातील अधिकारी जबाबदार आहे. चुकांसाठी अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना जोशी यांनी केली. सर्वेतील त्रुटीला सायबरटेक कंपनी जबाबदार असल्याने कंपनीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करावा तसेच कंपनीचे कंत्राट रद्द करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केली.सायबरटेकला पाठिशी घालणार नाही : आयुक्तमालमत्ता सर्वेक्षणात सायबरटेक कंपनीच्या त्रुटी आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाईल. या कंपनीला पाठिशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली. सर्वेक्षणाचे काम समाधानकारक असेल तरच कंपनीला बिल दिले जाईल. कर निर्धारणाची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. ज्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नागरिकांच्या हितासाठी कर आकारणीच्या पद्धतीत पारदर्शता व सुसूत्रता आणण्यासाठी यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुदगल यांनी सांगितले.मालमत्ता कर आकारणीत सुधारणा-बांधकामात बदल नसल्यास मालमत्ताधारकांना मागील वर्षीच्या घरटॅक्सच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक टॅक्स भरावा लागणार नाही.-भाडेकरू असल्यास आकारण्यात येणारा तीनपट कर रद्द करण्यात आला. निवासी व व्यावसायिक आधारावर कर आकारणी केली जाणार.-इमारत बांधकामाच्या २० टक्के क्षेत्र वगळून ८० टक्के क्षेत्रफळावर कर आकारणी करणार.-३१ मार्च २०१८ पर्यत कर न भरणाऱ्यांना कोणत्याही स्वरुपाचा दंड आकारला जाणार नाही. ४ टक्के सवलत मिळणार-मोठ्या इमारतीसाठी १५००चौ. फुटाऐवजी २००० चौ. फूट क्षेत्र गृहीत धरणार. प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणार

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर