शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्णधार विराट कोहलीने टिपले ५० झेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:32 IST

श्रीलंकेविरुद्ध व्हीसीए जामठा स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडूंनी गुरुवारी कसून सराव केला.

ठळक मुद्देभारतीय संघातील खेळाडुंचा कसून सराव

आॅनलाईन लोकमतनागपूर : श्रीलंकेविरुद्ध व्हीसीए जामठा स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या  दुसऱ्या  कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडूंनी गुरुवारी कसून सराव केला. कर्णधार विराट कोहलीसह स्पेशालिस्ट सलामीवीर मुरली विजय, के.एल. राहुल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, यष्टिरक्षक रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी फलंदाजीचा सराव केला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी भारतीय संघाचे सराव सत्र झाले. फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी फलंदाजांना आखूड टप्प्याच्या चेंडूवर सराव दिला तर रवी शास्त्री विशेषता मुरली विजयच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करून असल्याचे दिसले. सरावसत्रादरम्यान रवी शास्त्री व विराट कोहली बराच वेळ चर्चा करीत असल्याचे दिसले. सर्वांची नजर स्थानिक खेळाडू व ‘विदर्भ एक्स्प्रेस’नावाने ओळखल्या जाणाऱ्या उमेश यादववर होती. त्याने बराच वेळ गोलंदाजी केली. उमेशपूर्वी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी सराव केला. नेटव्यतिरिक्त शमीने मैदानावरील प्रॅक्टिस पिचवर गोलंदाजीचा सराव केला. स्थानिक गोलंदाजांनाही या सराव सत्रात सहभागी करून घेण्यात आले होते. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवही गोलंदाजीचा सराव करताना दिसला. आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने गोलंदाजीचा सराव केला, पण जडेजाने केवळ फलंदाजीचा सराव केला. तामिळनाडूचा अष्टपैलू विजय शंकर सराव सत्रात सहभागी झाला होता, पण त्याने काहीवेळ फलंदाजी व गोलंदाजी केली. बराचवेळ तो नेटच्या बाहेर होता, पण क्षेत्ररक्षणाच्या सरावाच्या वेळी मात्र तो बराचवेळ कर्णधार कोहलीसोबत होता. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधरने कोहली, शंकर यांना उंचीवरच्या झेलचा सराव दिला तर चेतेश्वर पुजाराला फलंदाजाच्या जवळच्या क्षेत्ररक्षणाचा सराव दिला.