शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या कौशल्याला सरावाची जोड हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:30 IST

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण बनविणे अत्यावश्यक झाले. केवळ पदवी प्रदान न करता विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना कौशल्याचे ज्ञान दिले पाहिजे.

ठळक मुद्देविकास महात्मे : नागपूर विद्यापीठातर्फे उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण बनविणे अत्यावश्यक झाले. केवळ पदवी प्रदान न करता विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना कौशल्याचे ज्ञान दिले पाहिजे. कौशल्यात विद्यार्थी मागे पडू नये यासाठी त्याला सरावाची जोड देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व खासदार डॉ. विकास महात्मे यांनी व्यक्त केले. शिक्षकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे मंगळवारी उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.गुरुनानक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे होते; सोबतच प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव पूरण मेश्राम हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमात उत्कृष्ट शिक्षक, प्राचार्य, संशोधन, लेखक पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. महात्मे यांनी कार्यक्रमादरम्यान उपस्थितांसमोर ‘पॉवर पॉर्इंट’ सादरीकरण करीत आपले मुद्दे मांडले. बदलत्या शिक्षण व्यवस्थेत शिक्षणाचा विस्तार झाला, मात्र त्याला कौशल्याची जोड हवी तशी मिळालेली नाही. त्यामुळे पदवी घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी प्रत्यक्ष काम करताना चांगले प्रदर्शन करेल, असे होत नाही. शिक्षण काळातच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना नेमके शिकविल्यापैकी काय समजले याची पडताळणी शिक्षकांनी करायला हवी. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागरूक करण्यासोबत विचार करण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्यांनीदेखील स्वत:ची जबाबदारी ओळखून जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करण्यावर भर ठेवला पाहिजे, असा सल्ला डॉ. महात्मे यांनी दिला. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धतीतूनच आपण समृद्ध व समाजाभिमुख भावी पिढी घडवू शकू, असेदेखील ते म्हणाले. डॉ. प्रमोद येवले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले, तर पूरण मेश्राम यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मैत्रयी घनोटे हिने सिन्थेसायझरवर वाजविलेल्या राष्ट्रगीताच्या धूनने झाली.गुरू बना, ‘बाबा’ नाहीयावेळी कुलगुरूंनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनावे, भोंदू ‘बाबा’ बनण्याचे काम त्यांनी करू नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सर्वार्थाने घडविले पाहिजे व त्याच्यात आत्मविश्वास जागृत केला पाहिजे, असे डॉ. काणे म्हणाले.पुरस्काराचे मानकरीउत्कृष्ट प्राचार्य : डॉ. राजेश पांडे, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयउत्कृष्ट शिक्षक : मेधा कानेटकर (सी.पी.अ‍ॅन्ड बेरार महाविद्यालय), डॉ. सुजाता देव (शासकीय विज्ञान संस्था), डॉ. ओमप्रकाश चिमणकर (भौतिकशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ), डॉ. किरण नागतोडे (स्वावलंबी शिक्षण महाविद्यालय), डॉ. यशवंत पाटील (मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस महाविद्यालय),उत्कृष्ट संशोधक : डॉ. डी. एम. कोकरे (फार्मसी विभाग, नागपूर विद्यापीठ), डॉ. राजेश उगले , डॉ. शुभांगी रतकंठीवार (वायसीसीई), डॉ. कीर्तीकुमार रणदिवे(भूगर्भशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ), डॉ. भारतभानवासे (लक्ष्मीनारायण तंत्रशिक्षण संस्था)उत्कृष्ट शिक्षक(सामाजिक कार्यकर्ता): डॉ. उल्हास मोगलेवार (संत गाडगेबाबा महाविद्यालय), प्रा. भालचंद्र हरदास (रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय), डॉ. विलास घोडे (भय्यासाहेब पांढरीपांडे समाजकार्य महाविद्यालय)उत्कृष्ट लेखक : डॉ. संजय जैन (प्रियदर्शिनी महाविद्यालय), वर्षा गंगणे (मनोहरभाई पटेल महाविद्यालय, देवरी), डॉ. गजानन पाटील (मनोहरराव कामडी महाविद्यालय)