शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मेट्रोच्या डबलडेकर पुलाला जोडले ‘सहा स्पाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:27 IST

वर्धा रोडवर सोनेगाव पोलीस ठाण्यासमोरून अजनी चौकातील खासगी रुग्णालयापर्यंत डेबलडेकर पुलाचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यात जोडणार ‘रिब’ : जून २०१८ पर्यंत काम पूर्ण होणार

आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवर सोनेगाव पोलीस ठाण्यासमोरून अजनी चौकातील खासगी रुग्णालयापर्यंत डेबलडेकर पुलाचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू आहे. मेट्रोच्या डबलडेकर पुलाला आतापर्यंत सहा स्पाईन जोडण्यात आले आहेत. ३.१४ कि़मी. लांब पुलासाठी १०५ पिलर उभारण्यात येणार आहेत. आतापर्यंत ४० पेक्षा जास्त पिलरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या पिलरवर अन्य वाहनांच्या वाहतुकीसाठी बांधण्यात येणाºया खालील पुलाला स्पाईन जोडण्याचे काम सुरू झाले आहे. स्पाईन म्हणजे पाठीच्या कण्यासारखे काँक्रिट स्ट्रक्चर अर्थात गर्डरला दोन पिलरमध्ये लावण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत नऊ पिलरमध्ये गर्डर बसविण्यात आले आहेत.‘रिब अ‍ॅण्ड स्पाईन टेक्नोलॉजी’प्रत्येक गर्डरची रुंदी ८ मीटर आहे. हे गर्डर जामठा येथील कास्टिंग यार्डमध्ये तयार करण्यात येत आहेत. गर्डर बसविल्यानंतर दोन महिन्यानंतर प्रत्येक गर्डरच्या दोन्ही बाजूला चार-चार मीटरची ‘रिब’ अर्थात एक आणखी गर्डर जोडण्यात येईल. या प्रकारच्या बांधकामाच्या तंत्रज्ञानाला ‘रिब अ‍ॅन्ड स्पाईन टेक्नोलॉजी’ म्हटले जाते. भारतात या तंत्रज्ञानाने आतापर्यंत जयपूर येथे डबलडेकर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यानंतर वर्धा रोडवर बांधकाम सुरू असलेल्या डबलडेकर पुलामध्ये एकूण १०४ स्पाईन (मुख्य गर्डर) आणि २०८ रिब (अटॅचमेंट गर्डर) बसविण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेश कुमार यांनी लोकमतशी बोलताना दिली. महेश कुमार म्हणाले, पुढील दोन महिन्यात डबलडेकर पुलाला ‘रिब’ लावण्याचे काम सुरू होणार आहे. वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून हे काम सध्या सुरू केलेले नाही तर दुसरीकडे स्पाईन (गर्डर) लाँचिंगचे काम वेगात सुरू आहे. त्यामुळे डबलडेकर पुलाचे बांधकाम जून २०१८ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.तीन मेट्रो स्टेशनचे बांधकामवर्धा रोडवर डबलडेकर पुलावर मेट्रो रेल्वेसाठी उज्ज्वलनगर, जयप्रकाशनगर, छत्रपतीनगर या तीन मेट्रो स्टेशनचे बांधकाम सुरू आहे. जवळपास ३५० कोटींच्या गुंतवणुकीतून तयार होणाºया डबलडेकरच्या बांधकामाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनवर (महामेट्रो) सोपविली आहे. महामेट्रोने बांधकामाचे कंत्राट नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे.पिलर आहेत विशेषडबल डेकर पुलाचे पिलर मेट्रो रेल्वेच्या पिलरपेक्षा वेगळे आणि विशेष आहेत. प्रारंभी पिलरची उंची ५.५ मीटर आणि त्यानंतर १५ ते १८ मीटरपर्यंत राहील. साई मंदिरासमोर जास्त उंचीचे पिलर तयार करण्यात आले आहेत. हे पिलर दोन भागात आहेत. पहिल्या भागाचे बांधकाम झाल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या वाहतुकीसाठी पुलावर स्लॅब टाकण्यात येईल. त्यावर अर्थात अंतिम भागाचे बांधकाम झाल्यानंतर मेट्रो रेल्वेसाठी स्लॅब टाकण्यात येणार आहे.