शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबई-नागपूर सहा विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 10:17 IST

दिवाळीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधाअतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :दिवाळीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची सुविधा झाली आहे.नागपूरवरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. विदर्भ एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेसमध्ये नेहमीच वेटिंगची स्थिती पाहावयास मिळते. दिवाळीच्या काळात हे वेटिंग आणखीनच वाढले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ०२०३२ नागपूर-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस विशेष रेल्वेगाडी नागपूरवरून शुक्रवार ९, १६ आणि २३ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता सोडण्यात येईल. ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सकाळी ५.१० वाजता पोहोचेल.रेल्वेगाडी क्रमांक ०२०३१ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून गुरुवारी ८, ११ आणि २२ नोव्हेंबरला रात्री ११.३५ वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण, दादर येथे थांबा देण्यात आला आहे.दोन्ही गाड्यात एकूण १२ कोच असून त्यात एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, चार स्लिपर आणि पाच साधारण द्वितीय कोच राहतील. या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण प्रवाशांसाठी आरक्षण केंद्रावर उपलब्ध असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर