शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

पत्नी, नातेवाईक आणि बँकांना सहा कोटींचा गंडा

By admin | Updated: February 19, 2017 02:14 IST

स्वत:ची पत्नी, नातेवाईक, मित्र तसेच बँका व खासगी फायनान्स कंपन्यांना ६ कोटी १५ लाख रुपयांनी गंडा घालण्याचा आरोप

तदर्थ न्यायालय : रजनिश सिंगचा अटकपूर्व जामीन फेटाळाला नागपूर : स्वत:ची पत्नी, नातेवाईक, मित्र तसेच बँका व खासगी फायनान्स कंपन्यांना ६ कोटी १५ लाख रुपयांनी गंडा घालण्याचा आरोप असलेल्या आरोपी रजनिश सिंग याचा अटकपूर्व जामीन अर्ज तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. काटोल रोडवरील उत्कर्षनगर येथील रहिवासी सुनीता सिंग या रजनिश सिंग याच्या पत्नी आहेत. त्यांनी १२ नोव्हेंबर २०१६ रोजी दाखल केलेल्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात रजनिशसिंगविरुद्ध भादंविच्या ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. सुनीता आणि रजनिश यांचा विवाह २००३ मध्ये झाला होता. २००४ मध्ये त्यांनी उत्कर्षनगर येथे घर विकत घेतले होते. आता त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. २००८ मध्ये रजनिशने सुनीता सिंग यांना विश्वासात घेऊन उत्कर्षनगर येथे मॅपल मल्टिसिस्टिम नावाची अ‍ॅल्युमिनियम अ‍ॅनोडाईज डोअर व विंडो तयार करणारी कंपनी उघडली होती. उत्कर्षनगर येथील घरावर या कंपनीसाठी काटोल मार्गावरील युनियन बँकेतून ३५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. पुढे याच घरावर त्याने पत्नीला अंधारात ठेवून एक कोटी रुपयांचे वाढीव कर्ज घेतले होते. पुढे त्याने कधी मित्रांच्या तर कधी नातेवाईकांच्या बनावट दस्तावेजांवर बँक आणि खासगी वित्त कंपन्यांकडून कर्ज घेऊन फसवेगिरी करण्याचा सपाटाच सुरू केला होता. त्याने मॅपल कंपनीच्या नावे युनियन बँकेतून ५० लाख, एचडीएफसी बँकेतून १० लाख, आयसीआयसीआय बँकेतून ५ लाख, चोला मंडलमकडून ७ लाख ५४ हजार ९६५ रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केली. याशिवाय मित्र नितीन श्रीवास यांची एमआयडीसी वॉटर प्लान्टची यंत्रसामुग्री तारण ठेवून ४८ लाख, विष्णुकुमार ओझा यांची १ कोटी २१ लाख ४७ हजार रुपयांनी, मनोज शेंडे यांची १० लाख, ए. के. पांडे यांची ९ लाख, अमोल झाडे यांची ६० लाख, नवनीत पांडे यांची ७६ लाख, प्रशांत सिंग यांची ५० लाख, अनिल सिंग यांनी ६ लाख ५० हजार, राकेश सिंग यांची १५ लाख आणि दास यांची १० लाख रुपयांनी फसवणूक केली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील गिरीश दुबे यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे हे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)