गुन्हा दाखल : ३२.६० लाखाचा मुद्देमाल जप्तनागपूर : अवैधरीत्या गौण खनिज रेतीचे उत्खनन करून चोरी करणाऱ्या सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३२ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला आहे.१२ आॅक्टोबरला रात्री ३ ते ४ दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकात्मतानगरकडे जाणाऱ्या दुपदरी रस्त्यावर जयताळा वस्तीजवळ आरोपी आशिष शामराव वाढनकर (२५), उमेश आनंद मेश्राम (३०) दोन्ही रा. स्वामी विवेकानंदनगर, कन्हान, आशिष ईश्वर भगत (२६) लता मंगेशकरनगर खरबी रोड, परमानंद भास्कर जीभकाटे (२३) रा. घरसंसार सोसायटी पारडी, प्रदीप मेवालाल कैथवास (२५) रा. प्रगतीनगर कन्हान आणि नरेश पुंडलिक चौरे (२७) रा. रामनगर कन्हान हे विना परवाना रेतीचे उत्खनन करून वाहतूक करीत असताना आढळले. त्यांच्याकडून ट्रक क्र. एमएच ४०, वाय ३९३९ किंमत ८ लाख आणि ३ ब्रास रेती किंमत १५ हजार, ट्रक क्रमांक एमएच ४०, वाय ९३३९ किंमत ८ लाख आणि ३ ब्रास रेती किंमत १५ हजार, ट्रक क्रमांक एमएच ४०, वाय ९४३९ किंमत ८ लाख आणि ३ ब्रास रेती किंमत १५ हजार, ट्रक क्र. एमएच ४०, वाय ९७७८ किंमत ८ लाख आणि ३ ब्रास रेती किंमत १५ हजार असा एकूण ३२ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
अवैधरीत्या रेती उत्खननप्रकरणी सहा अटकेत
By admin | Updated: October 13, 2014 01:17 IST