शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
2
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
3
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
4
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
5
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
8
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
9
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
10
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
11
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
12
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
13
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
14
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
15
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
16
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
17
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
18
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
19
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
20
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!

नियमात बसली, उत्साहात फुटली

By admin | Updated: August 26, 2016 02:45 IST

दहीहंडीचे मनोरे २० फुटापेक्षा उंच असणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे शेवटपर्यंत कायम राहिल्याने आयोजकांना धक्काच बसला होता.

इतवारीची दहीहंडी : गोविंदाचा जल्लोष नागपूर : दहीहंडीचे मनोरे २० फुटापेक्षा उंच असणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे शेवटपर्यंत कायम राहिल्याने आयोजकांना धक्काच बसला होता. त्यामुळे दहीहंडीच्या उत्साहात सहभागी होणाऱ्यांचा आनंदही मावळला होता. कदाचित दहीहंडीचे आयोजनच होणार नाही, हंडीचे आयोजन झाले तरी थरार, उत्साह, आनंद मिळणार नाही, अशी भीती होती. परंतु आयोजकांनी लढविलेल्या शक्कलमुळे दहीहंडी नियमात बसली आणि उत्साहात फुटली. इतवारी नवयुवक मंडळातर्फे आयोजित दहीहंडीच्या उत्सवात दरवर्षीप्रमाणेच उत्साह आनंद सहभागी गोविंदांसह, दर्शकांनीही अनुभवला. जन्माष्टमी म्हटले की, लोकांमध्ये दहीहंडी स्पर्धेचा वेगळाच उत्साह संचारतो. उंचावर असलेली दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गोविंदा पथकांचे साहस आणि गोविंदा आला रे...ची आरोळी देत तेवढ्याच उत्साहात सहभागी होणारे दर्शक. साहसाचे असेच उत्साही दृश्य शहरातील इतवारी दहीहंडी स्पर्धेच्या वेळी दिसले. एक, दोन, तीन, चार...म्हणत गोविंदा पथकांनी जीवाची बाजी लावत दही-दुधाची मटकी फोडून लाखोंच्या बक्षिसाला गवसणी घातली. उंचापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न फसला की, नाचत परतणारे गोविंदा पथक पुढच्या प्रयत्नासाठी सज्ज राहत होते. प्रत्येक राऊंडनगर हंडीची उंची कमी होत होती. सर्वत्र हा उत्साह ओसंडून वाहत होता. दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेले गोविंदा पथकातील सदस्य थरावर थर करुन दहीहंडीच्या उंचीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर हंडीपर्यंत गोविंदा पोहचण्यात यशस्वी जाले. हंडी फोडून गोविंदा पथकांनी आनंद साजरा केला. फक्त ११ गोविंदांची अट न्यायालयाच्या निर्देशानुसार आयोजकांनी दहीहंडीची उंची २० फुट ठेवली होती. मात्र हंडी फोडण्यासाठी प्रत्येक चमूत ११ गोविंदाच सहभागी असतील अशी अट घातली होती. त्यामुळे गोविंदाचे मनोरे कमी झाले. मात्र थरार आणि उत्साह कायमच होता. असे आहेत विजेतेमहिलांमध्ये न्यू सोनेगावच्या राधाकृष्ण महिला मंडळाच्या चमूने दहीहंडी फोडली. तर पुरुष गटात सोनधरी येथील जय माँ काली क्रीडा मंडळाचे गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यात यशस्वी ठरले.