शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

घरी बसून करा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 09:57 IST

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांनी निराश न होता युपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांचा ऑनलाईन अभ्यास करावा, असे आवाहन प्राध्यापकांद्वारे केले जात आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासाची संधीपीडीएफ आणि व्हिडिओही उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या अचानक झालेल्या उद्रेकामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी शासकीय नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. या काळात मोठ्या शहरात क्लास लावून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सर्व सोडून घरी परतावे लागले आहे. आता घरात बसून काय करावे हा प्रश्न त्यांना पडतो आहे. काहींनी आपली पुस्तके सोबत आणली तर काही मात्र तसच सोडून परतले आहेत. मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांनी निराश न होता युपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांचा ऑनलाईन अभ्यास करावा, असे आवाहन प्राध्यापकांद्वारे केले जात आहे. सध्यातरी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे, मात्र परिस्थिती आटोक्यात आली नाही तर पुढेही अशीच स्थिती कायम राहू शकते. एप्रिल ते जूनपर्यंत ही परिस्थिती राहणे शक्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे कंटाळवाणे वाटून घेण्यापेक्षा या काळाचा सदुपयोग करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वर्तमान परिस्थितीत सोशल मीडियाचे प्रभावी माध्यम विद्यार्थ्यांजवळ उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून अभ्यास केला जाउ शकतो. पुस्तके नाही म्हणून घरी रिकामे न बसता सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करत आपला अभ्यास करता येईल. यासाठी इंटरनेटवर विविध वेबसाईट आहेत. ज्या अपडेट देखील करण्यात आल्या आहे. यावर माहितीसह काही पुस्तकांचे पीडीएफ देखील उपलब्ध आहे. यासोबतच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे व्हिडिओ देखील उपलब्ध आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होते . तसेच अभ्यास करण्यास अडचणी देखील येत नाही. या वेबसाइटचे लाखो युजर्स असले तरी या काळात नेहमीच्या तुलनेत अधिक विद्यार्थ्यांनी साईटचा वापर करावा. परीक्षेची तारीख पुढे ढकलली गेली असली तरी लवकरच परीक्षा होणार असल्याने या विद्याथ्यार्नी तंत्रज्ञानाचा वापर करत अभ्यास करावा, असा सल्ला प्राध्यापकांनी दिला आहे. आजच्या या आधुनिक आणी धकाधकीच्या काळात प्रत्येक तरुण हा शासकीय नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहे. यासाठी दिवसरात्र अभ्यास करत आहे. यात एरवी अभ्यासासाठी ग्रंथालयांमध्ये पुस्तकांच्या गराड्यात बसलेले तरुण पाहणे नित्याचे असले तरी सध्या कोरोनाच्या धास्तीने मात्र हे तरुण आपल्या गावी घरातच बसून आहे. तब्बल २१ दिवस घरातच रहावे लागणार असल्याने या तरुणांना आपला अभ्यास बुडण्याची मोठी चिंता लागून आहे. वेळ हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा असला तरी सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन अभ्यासाशिवाय दुसरा चांगला पर्याय असू शकत नाही, हेही तितकेच खरे.या आहेत महत्वाच्या साईट -मिशन एमपीएससी गव्हर्नमेंट अड्डा एमपीएससी कट्टा एमपीएससी ट्रिक्स पीडीएफ फॉर एक्झाम यूपीएससी मटेरीअलएमपीएससी अलर्ट युएन कॅडमी एमपीएससी ठोकळा

 

टॅग्स :examपरीक्षा