शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीने बहिणीला दिले जीवनदान

By admin | Updated: March 9, 2017 22:52 IST

मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या ३४ वर्षीय बहिणीला तिच्याच लहान बहिणीने स्वत:ची किडनी दान करून जीवनदान दिले. बुधवारी

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 9 - मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या ३४ वर्षीय बहिणीला तिच्याच लहान बहिणीने स्वत:ची किडनी दान करून जीवनदान दिले. बुधवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बहिणीने दिलेल्या या अवयवाचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. ह्यसुपरह्णमधले हे अकरावे यशस्वी किडनी प्रत्यारोपण आहे. बहिणीला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणणारी सोनु सुरेंद्र डोंगरे (३३) रा. यशोधरानगर असे लहान बहिणीचे नाव आहे तर मोठ्या बहिणीचे नाव डॉ. मोना गायकवाड (३४) आहे. कुही-मांडळ येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. मोना गायकवाड कार्यरत आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून त्यांना किडनीचा आजार आहे. नोव्हेंबर २०१६ पासून त्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलिसीस घेत आहे. मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त आपल्या बहिणीच्या जीवासाठी लग्न झालेली लहान बहीण सोनू डोंगरे हिने पुढाकार घेतला. त्यांना दोन मुले असतानाही बहिणीला मूत्रपिंड दान करून वाचवण्याचा निश्चय केला. यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मदतीला धावून आली. या शस्त्रक्रियेसाठी येणारा सर्व खर्च या योजनेतून करण्यात आला. हे यशस्वी किडनी प्रत्यारोपण मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात युरो सर्जन डॉ. संजय कोलते, डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. कुणाल मेश्राम, डॉ. अमित, डॉ. नीलेश नागदिवे, नेफ्रॉलॉजिस्ट विभाग प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. विशाल रामटेके, भूलतज्ज्ञ डॉ. विजय श्रोते, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. योगेश झंवर, डॉ. गगन अग्रवाल व मूत्रपिंड प्रत्यारोपण समन्वयक डॉ. मोहम्मद मेहराज शेख यांनी परिश्रम घेतले. दोन्ही बहीणींची प्रकृती स्थिरएकीकडे नात्या-नात्याला तडे जात असताना लग्न झालेल्या बहिणीला स्वत:ची किडनी दान करण्याची सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधली ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्यारोपणात आईने मुलाला, बहिणीने भावाला, वडिलाने मुलाला तर पत्नीने पतीला मूत्रपिंड दान केले आहे. विशेष म्हणजे, डॉ. गायकवाड यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपण तीन वेळा विविध कारणाने टळले. अखेर चौथ्या प्रयत्नात यशस्वी झाले. सध्या दोन्ही बहिणींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.