शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, तुम्ही बोलले होते आता दक्षिण द्या !

By admin | Updated: August 30, 2014 02:43 IST

दक्षिण नागपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपलाच मिळावी, यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे.

नागपूर : दक्षिण नागपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपलाच मिळावी, यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. दक्षिणचे पदाधिकारी, नगरसेवक, प्रभाग अध्यक्ष यांनी शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वाड्यावर भेट घेतली. साहेब, लोकसभा निवडणुकीत तुम्ही बोलले होते, आम्ही ६० हजारावर लीड मिळवून दिली. आता दक्षिणची जागा भाजपलाच मिळवून द्या, अशी एकमुखी मागणी या नेत्यांनी गडकरींकडे केली. दक्षिणच्या जागेसाठी भाजप पदाधिकारी आग्रही असून जागा शिवसेनेला गेल्यास आपल्यापैकी एकाला अपक्ष म्हणून रिंगणात उतरविण्याचा छुपा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त लोकमतने शुक्रवारच्या अंकात प्रकाशित केले. यानंतर सकाळी दक्षिणमधील भाजप नेत्यांनी गडकरी यांची भेट घेत दक्षिणची मागणी केल्यामुळे लोकमतच्या वृत्तावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब झाले आहे. माजी आ. अशोक मानकर, मोहन मते, शहर महामंत्री सुधाकर कोहळे, आरोग्य सभापती रमेश शिंगारे, बळवंत जिचकार, सतीश होले, माजी महापौर कल्पना पांडे, निता ठाकरे, कैलास चुटे यांच्यासह भाजप पदाधिकारी सकाळी वाड्यावर पोहचले. या सर्व पदाधिकाऱ्यांनी गडकरी यांच्या समक्ष आपली बाजू मांडली. दक्षिण नागपुरात शिवसेना सातत्याने पराभूत होत आली आहे. भाजप कार्यकर्ते परिश्रम घेतात मात्र त्यानंतरही सेनेचे नेटवर्क नसल्यामुळे विजय मिळत नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपने तळागाळात जाऊन काम केले. येथे काँग्रेसचा आमदार असतानाही भाजपला ६० हजारावर आघाडी मिळाली. दक्षिणमध्ये भाजप बूथ स्तरावर बळकट झाली आहे. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची दखल घेत या वेळी ही जागा भाजपला मिळवून द्यावी, अशी विनंती सर्वांनी गडकरी यांना केली. गडकरी यांची सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. या मागणीसंदर्भात आपण प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घ्या, अशी सूचना गडकरी यांनी केली. त्यानुसार आता दक्षिणचे पदाधिकारी फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भाजप- शिवसेनेचे संबंध दक्षिणमध्ये तरी ताणले जाण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)