शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

एकल तबलावादनाने रंगलेली मैफिल

By admin | Updated: April 20, 2016 02:57 IST

संगीताच्या दुनियेतील महत्त्वाचे तालवाद्य म्हणजे तबला. गायनाच्या बदलत्या अभिरुचीनुसार ख्याल गायकीसारख्या मुलायम...

स्वरवेद आणि अभ्यंकरनगर नागरिक मंडळाचे आयोजन : पं. मकरंद तुळणकर यांचे तबलावादन नागपूर : संगीताच्या दुनियेतील महत्त्वाचे तालवाद्य म्हणजे तबला. गायनाच्या बदलत्या अभिरुचीनुसार ख्याल गायकीसारख्या मुलायम व चंचल गायनासाठी गेल्या अनेक शतकापासून याच वाद्याचा उपयोग केला जात आहे. या क्षेत्रातील आजचे आघाडीचे आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत पुणे येथील पं. मकरंद तुळणकर यांच्या तबलावादनाने मंगळवारी उपस्थितांना जिंकले. स्वरवेदतर्फे श्री त्रानेश्वर मंदिर दालन, बजाजनगर येथे पं. तुळणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांच्या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्थानिक तबलावादकांसाठी अतिशय उपयोगी ठरलेले हे मार्गदर्शन होते. एकूणच नवोदित विद्यार्थ्यांचा सहभाग या कार्यशाळेत होता. अभ्यंकरनगर नागरिक मंडळाने कार्यशाळेसाठी सहकार्य केले. या कार्यशाळेच्या समापनाला पं. तुळणकर यांच्या तबलावादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तबल्याला बोलांची भाषा असते असेच सर्वांना वाटते. मात्र प्रतिभावंत कलावंत तबलावादनातून सजीवतेचा आनंद देऊ शकतो, याचा प्रत्यय त्यांच्या वादनात होता. त्यांचे वादन म्हणजे संभाषण, गायन आणि नर्तन होते. व्ही. कान्हेरे आणि पं. एस. पंडित आंनिंदो चटॅर्जी यांच्या शिष्य असलेल्या पं. तुळणकर यांनी आपल्या घुमारेदार व सौंदर्यात्मक शैलीच्या वादनाने रसिकांची दाद घेतली. त्यांचे बोलबंदिस लावण्य, सुस्पष्टता वादातीत होते. कार्यक्रमाला रवींद्र कासखेडीकर, आशुतोष अडोणी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेतील विद्यार्थी वेद नेक, साहिल बनीकर, चैतन्य शर्मा, आकांक्षा भेंडे, अथर्व शेष, आदित्य शिलेदार, अजिंक्य ताम्हणकर, अथर्व उपगडे यांनी सामूहिक तबलावादन केले. पं. तुळणकर यांना नरेंद्र कडवे यांनी लहरासंगत केली.निवेदन दीपाली घोंगे यांचे होते. कलावंतांचे व अतिथींचे स्वागत रवी सातफळे, मनीषा तुळणकर यांनी केले. (प्रतिनिधी)