शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी करप्रणाली व्यापारपुरक व सरळसोपी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:10 IST

नागपूर : जीएसटी करप्रणालीला लागू होऊन चार वर्षे झाली आहेत. आता सरकार आणि व्यापाऱ्यांना त्यातील दोषांचा अनुभव आला आहे. ...

नागपूर : जीएसटी करप्रणालीला लागू होऊन चार वर्षे झाली आहेत. आता सरकार आणि व्यापाऱ्यांना त्यातील दोषांचा अनुभव आला आहे. या आधारावर व्यापाऱ्यांचा करांचा बोजा कमी करण्यासाठी जीएसटी व्यवस्थेची नव्या पद्धतीने समीक्षा व्हावी आणि करप्रणालीचे सरळीकरण करावे, अशी मागणी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया आणि राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी यावेळी केली.

जीएसटीअंतर्गत कर टप्प्यांचा विस्तार आणि केंद्र व राज्याच्या महसुलात वाढ होणे आवश्यक आहे. कॅटच्या नागपुरात सुरू असलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय व्यापार अधिवेशनात देशभरातून आलेल्या २०० पेक्षा जास्त व्यापारी नेत्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भरतीया म्हणाले, किचकट जीएसटी करप्रणालीविरुद्ध २६ फेब्रुवारीला कॅटतर्फे संपूर्ण भारतात व्यापार बंद आंदोलनाची घोषणा केली असून त्याला व्यापाऱ्यांचा व्यापक प्रतिसाद मिळत आहे. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनने (एटवा) समर्थनार्थ २६ फेब्रुवारीला चक्का जाम करण्याची घोषणा केली आहे. ऑल इंडिया एफएमसीजी डिस्ट्रिब्यूटर्स असोसिएशन, देशातील ज्वेलरी व्यापार संघटना ऑल इंडिया ज्वेलर्स व गोल्डस्मिथ फेडरेशन, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया अ‍ॅल्युमिनियम युटेंनसिलस मॅन्युफॅक्चरर्सने बंदचे समर्थन केले आहे.

१६ ला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

भरतीया म्हणाले, १६ फेब्रुवारीला देशातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक व्यापारी संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने जीएसटी करप्रणालीला सरळसोपी करण्यासाठी निवेदन देणार आहे. १४ ते २५ फेब्रुवारीपर्यंत देशभरातील व्यापारी बाजारपेठांमध्ये मार्च करतील आणि देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि अन्य संबंधित लोकांना निवेदन देतील.