शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्याबाबत मौन

By admin | Updated: November 28, 2014 01:04 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऐनवेळी परीक्षा ‘पोस्टपोन’ का केल्या यासंदर्भात गुरुवारी झालेल्या विद्वत् परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. परंतु आपल्या चुकांवर

विद्वत् परिषदेत मुद्दा उपस्थित : ‘अ‍ॅकेडमिक कॅलेंडर’चे पालन का नाही?नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऐनवेळी परीक्षा ‘पोस्टपोन’ का केल्या यासंदर्भात गुरुवारी झालेल्या विद्वत् परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. परंतु आपल्या चुकांवर पांघरुण टाकण्यासाठी प्रशासनाने यासंदर्भात मौन बाळगले आणि सभागृहाला पूर्ण माहिती देणे शक्य नसल्याचे सांगितले. परीक्षा विभागातील काही माजी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विद्यापीठाला ‘सीबीएस’ पद्धतीच्या सर्व परीक्षा ‘पोस्टपोन’ कराव्या लागल्या. १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा २६ नोव्हेंबरला सुरू झाल्या. अनेक ‘पेपर्स’चे ‘मॉडरेशन’च झाले नसल्याने परीक्षा विभागाची अडचण झाली अशी माहिती सूत्रांनी दिली होती.यासंदर्भात विद्वत् परिषदेत सदस्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचे नेमके कारण काय याची विचारणा केली. विद्वत् परिषदेकडून ‘अ‍ॅकेडमिक कॅलेंडर’ तयार करण्यात येते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची आहे. परीक्षांचे वेळापत्रक बदलताना विद्यापीठाने संबंधित शाखांच्या अधिष्ठात्यांनादेखील विचारणा करण्याचे सौजन्य का दाखवले नाही असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. २२० पैकी ९८ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती यावेळी प्रशासनाने दिली. परंतु विद्यापीठाने परीक्षा समोर का ढकलण्यात आल्या यासंदर्भात सभागृहाला संपूर्ण माहिती देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.(प्रतिनिधी)‘बी.व्होक.’च्या विलंबाबाबत नाराजीविद्यापीठाने ‘बी.व्होक.’ अभ्यासक्रमाला अंतिम मान्यता देण्यासंदर्भात विलंब का लावला यासंदर्भातदेखील प्रश्न उपस्थित करण्यात आले. मागील महिन्यात २७ तारखेला झालेल्या विद्वत् परिषदेच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या की ‘बी.व्होक.’ला विशेषाधिकारात मान्यता देण्यात यावी. परंतु ते कुलगुरूंना शक्य नव्हते तर व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलविण्यास महिन्याभराचा कालावधी का लावला असा मुद्दा सदस्यांनी मांडला.महाविद्यालये बंद करण्यासाठी समितीदरम्यान, गुरुवारी झालेल्या विद्वत् परिषदेच्या बैठकीत अनेक महाविद्यालये तसेच अभ्यासक्रम बंद करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यासंदर्भात बैठकीदरम्यान चर्चा झाली. यासंदर्भातील प्रक्रियेकरिता महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ९२ नुसार चौकशी समिती गठित करण्याची मागणी महाविद्यालयांकडून करण्यात आली. विद्वत् परिषदेने या समिती गठित करण्याचे संपूर्ण अधिकार कुलगुरूंना दिले.