शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

कापसाला प्रति क्विंटल बोनस देण्याचे संकेत

By admin | Updated: December 8, 2014 00:56 IST

दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारतर्फे मदतीचा हात देण्याच्या हेतूने कापसाला प्रति क्विंटल बोनस देण्यावर सरकार विचार करीत आहे, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.

नागपूर : दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारतर्फे मदतीचा हात देण्याच्या हेतूने कापसाला प्रति क्विंटल बोनस देण्यावर सरकार विचार करीत आहे, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.विरोधी पक्षात असताना भाजपाने कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव देण्याची मागणी केली होती. आता प्रत्यक्षात ४०५० रुपये भाव मिळत आहे. याकडे खडसे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यावेळी कापसाच्या किमती वाढल्या होत्या. चीनमध्ये कापसाची मागणी होती. यावेळी चित्र वेगळे आहे. चीनने खरेदी थांबविली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव पडले आहेत. हमीभावापेक्षा कमी किमतीत कोणी कापूस खरेदी करू नये म्हणून सीसीआय आणि नाफेडतर्फे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. तरीही शेतकऱ्यांना मिळणारा भाव कमी आहे असे वाटत असल्याने प्रतिक्विंटल बोनस देण्याचा विचार शासन करीत आहे. अधिवेशन काळात सरकार घोषणा करू शकते. शेतकऱ्यांविषयी सरकारला सहानुभूती आहे व त्यांना मदत करण्याची तयारी आहे. पण यासंदर्भात निर्णय घेताना राज्याच्या आर्थिक स्थितीचाही विचार केला जाईल.शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. काही विमा कंपन्यांशी चर्चा झाली. विम्याचा हप्ता सरकारने भरण्याची तयारी दर्शविली आहे. पण कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नाही, असे खडसे म्हणाले.(प्रतिनिधी)दुग्ध उत्पादक अडचणीतदुधाचे दर कमी झाल्याने दुग्ध उत्पादक अडचणीत सापडला आहे. दूध पावडरवरील अनुदान केंद्र सरकारने सुरू करावे, अशी विनंती सरकारकडून करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात डिझेलच्या दरात मोठ्याप्रमाणात घट झाली. मात्र त्याचा फायदा दूध कंपन्या घेत आहेत. शेतकरी आणि ग्राहकांना तो मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे खडसे म्हणाले.राज्याबाहेरून पाणीराज्याबाहेरून पाणी आणण्याच्या संदर्भातील विविध प्रलंबित योजनांपैकी तीन योजनांच्या प्रस्तावांना केंद्राने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यात कोकणातून मुंबईत पाणी आणणे, कोकणातील पाणी मराठवाड्याकडे वळते करणे आदींचा त्यात समावेश आहे. १३ विधेयके मांडणारपुणे विद्यापीठाचा नामविस्तार, नांदेड गुरुद्वाराच्या कायद्यात दुरुस्ती, सहकारी संस्था निवडणूक, जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक, प्रादेशिक नियोजन व नगर रचना विधेयकासह एकूण १३ विधेयके अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळातील सदस्य अनुक्रमे गिरीश बापट,चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत,एकनाथ शिंदे उपस्थित होते.