शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉपर्टीच्या वादातून बहीण-भाऊ बनले वैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादातून सख्खे बहीण-भाऊ वैरी बनले. त्यांनी आपल्या छोट्या भावावर तसेच त्याच्या पत्नीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादातून सख्खे बहीण-भाऊ वैरी बनले. त्यांनी आपल्या छोट्या भावावर तसेच त्याच्या पत्नीवर हल्ला चढवून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास नंदनवनमध्ये ही घटना घडली.

जखमी अवस्थेत उपचार घेत असलेले दिलीप सखाराम गडरिया (वय ४०) यांनी नंदनवन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांचे हिवरी नगरात तीन खोल्यांचे घर आहे. दिलीप यांना श्यामराव आणि शोभा हे भाऊ तसेच बहीण आहे. या तिघांमध्ये वडिलांच्या घराच्या हिस्से वाटणीवरून नेहमीच वाद होतो. सोमवारी रात्री याच मुद्द्यावरून बहीण-भावात वाद सुरू झाला. त्यानंतर श्यामराव आणि शोभा या दोघांनी संगनमत करून दिलीपच्या डोक्यावर लाकडी फळीने जोरदार फटका मारला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. दिलीप यांची पत्नी पतीच्या मदतीला धावल्याचे पाहून आरोपीने तिच्याही डोक्यावर लाकडी फळीने फटका मारला. त्यामुळे दिलीप आणि त्याची पत्नी गंभीर जखमी झाले. आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपींना कसेबसे आवरले. जखमी दाम्पत्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच नंदनवन पोलीस रुग्णालयात पोहोचले. त्यांनी दिलीपचे बयान नोंदवून घेत आरोपी शामराव सखाराम गडरिया (५१) आणि त्याची बहीण शोभा (वय ४८) या दोघांविरुद्ध हत्या करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---