शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

श्वेता भट्टडने स्वत:ला तीन तास जमिनीत पुरून घेतले

By admin | Updated: February 8, 2016 03:11 IST

श्वेता भट्टड यांनी जनमंचच्या शेतकरी मेळाव्यादरम्यान स्वत:ला तीन तास जमिनीत पुरून घेत शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधले.

शेतकऱ्यांच्या व्यथांकडे वेधले लक्ष : तिसऱ्यांदा केला प्रयोगनागपूर : श्वेता भट्टड यांनी जनमंचच्या शेतकरी मेळाव्यादरम्यान स्वत:ला तीन तास जमिनीत पुरून घेत शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधले. श्वेता भट्टड या नागपुरातील प्रसिद्ध परफॉर्मर्स आर्टिस्ट आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्या स्वत:ला जमिनीत पुरून घेतात. हा त्यांचा तिसरा प्रयोग होता. यापूर्वी त्यांनी पुणे आणि पॅरिसमध्ये असा यशस्वी प्रयोग सादर केला आहे. रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पांढरे कपडे घालून त्यांनी स्वत:ला शवपेटीमध्ये बंद केले. ते संपूर्ण शवपेटी नंतर जमिनीत पुरण्यात आली. यासाठी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहातील पार्किंग परिसरात एक खड्डा तयार करण्यात आला होता. ही एक विशिष्ट प्रकारची शवपेटी होती. त्यात कॅमेऱ्याची सुविधा होती. त्यामुळे आत काय सुरू आहे, हे बाहेर असलेल्यांना एलसीडीवर पाहता येत होते. तीन तास त्या या शवपेटीसह जमिनीत होत्या. यादरम्यान श्वेता भट्टड या शवपेटीमध्ये झोपल्या नव्हत्या तर त्या एका बुकमध्ये विश्वास, विश्वास असे लिहित होत्या. ४ वाजून ३० मिनिटांनी जेव्हा त्यांना बाहेर काढण्यात आले तेव्हासुद्धा त्या लिहीतच होत्या. त्यांना जमिनीत पुरताना आणि बाहेर काढताना शेतकऱ्यांसह उपस्थितांनी मोठी गर्दी होती. श्वेता बाहेर येताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. अभिनंदनाचा वर्षाव केला. तीन डॉक्टरांची चमू ठेवून होती लक्ष श्वेता भट्टड यांच्या या प्रयोगासाठी दंदे हॉस्पिटलने विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती. स्वत: डॉ. पिनाक दंदे यांच्यासह डॉ. सुलभ शर्मा, डॉ. रितेश यांची चमू श्वेता यांच्यावर लक्ष ठेवून होते. त्यांना आॅक्सिजन व्यवस्थित मिळत आहे का, त्यांच्या हृदयाचे ठोके आदी सर्वांवर डॉक्टरांचे लक्ष होते. यासाठी आयसीयू फॅसिलिटी उपलब्ध होती. जनमंचतर्फे स्वागत तीन तस जमिनीत घालवून परत आल्यानंतर श्वेता भट्टड यांचे जनमंचतर्फे व्यासपीठावर स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. शरद निंबाळकर, ई.झेड. खोब्रागडे, अ‍ॅड. अनिल किलोर, प्रा. शरद पाटील, राजीव जगताप, डॉ. पिनाक दंदे यांनी त्यांचे स्वागत केले. सर्वांनी एकजूट व्हा - श्वेता भट्टडतुम्ही सर्वांनी एकजूट होऊन स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करावी, असे आव्हान श्वेता भट्टड यांनी यावेळी केले. जमिनीत स्वत:ला पुरण्यापूर्वी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी मी हा प्रयोग करीत आहे. हे करीत असतांना आपल्याला भीती वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विश्वासावरच सर्व अवलंबून असते असे स्पष्ट करीत आत आपण विश्वास असे लिहित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गर्व आहे, पण भीती वाटतेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपली मुलगी हा प्रयोग करते. त्यात तिला मान सन्मानही मिळतो याबाबत गर्व वाटतो. परंतु ती हा जीवघेणा प्रयोग करते, तेव्हा आई म्हणून भीती तर वाटतेच.उषा भट्टड, श्वेताची आई