शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ संघ स्वयंसेवक श्रीराम जोशी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 19:58 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व विदर्भ प्रांताचे माजी सहसंघचालक श्रीराम शंकर जोशी (८५) यांचे निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व विदर्भ प्रांताचे माजी सहसंघचालक श्रीराम शंकर जोशी (८५) यांचे निधन झाले. धरमपेठ येथे राहत्या घरी त्यांनी अंतिम श्वास घेतला. संघ वर्तुळात त्यांचा दांडगा संपर्क होता व जवळपास सर्वच सरसंघचालकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले होते. जोशी यांच्या निधनामुळे संघ वर्तुळात शोककळा पसरली होती.श्रीराम जोशी हे विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून ‘इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग’चे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. संघाशी ते लहानपणीच जुळले होते. शिशु स्वयंसेवकापासून त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींपासून ते अगदी विद्यमान सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासदेखील भोगला होता. याशिवाय ते सामाजिक वर्तुळातदेखील सक्रिय होते व विविध सामाजिक संस्थांशी जुळले होते. त्यांच्यावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात भाऊ लक्ष्मण, वहिनी, तीन मुले, सून व नातवंडे आहेत.श्रीरामजी समर्पित स्वयंसेवक होते : गडकरीकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी श्रीराम जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघकार्य पोहोचविण्यासाठी श्रीराम जोशी यांनी अव्याहत मेहनत केली. कार्यकर्ता घडविण्याची त्यांची हातोटी, त्यांची शिस्त, समाजाप्रति असलेले समर्पण कायमच सर्वांना प्रेरणा देत राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली.श्रीराम जोशींनी निष्ठावंत स्वयंसेवक घडविले : पुरोहितडॉ.श्रीराम जोशी हे व्यवसायाने शिक्षक व अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारे गुरू होते. स्वयंसेवकांमध्ये ते लोकप्रिय होते. शांत स्वभाव व संयमित व्यक्तिमत्त्वामुळे लोक त्यांच्याशी जोडले जात. त्यांनी अनेक निष्ठावंत स्वयंसेवक घडविले. त्यांच्याशी माझा काही दशकांपासून परिचय होता व त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले. त्यांच्या निधनामुळे माझे वैयक्तिक नुकसानदेखील झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना.-बनवारीलाल पुरोहित, राज्यपाल, तामिळनाडू

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ