शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
3
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
4
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
5
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
6
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
7
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
8
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
9
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
10
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
11
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
12
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
13
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
14
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
15
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
16
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
17
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
18
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
19
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
20
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी

शिक्षक मतदारसंघात श्रीकांत देशपांडे विजयी

By admin | Updated: June 26, 2014 00:45 IST

विधानपरिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष (शिक्षक आघाडी) उमेदवार श्रीकांत देशपांडे हे १६ व्या फेरीअखेर विजयी झाले. त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, अपक्ष

अमरावतीत मतांचा कोटा अपूर्ण : १६ व्या फेरीअखेर विजयाची घोषणाअमरावती : विधानपरिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष (शिक्षक आघाडी) उमेदवार श्रीकांत देशपांडे हे १६ व्या फेरीअखेर विजयी झाले. त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, अपक्ष उमेदवार अरुण शेळके यांचा ४ हजार ९४२ मतांनी पराभव केला. देशपांडे यांना १२,१०९ तर अरुण शेळके यांना ७,१६७ मते मिळालीत. एकूण १७ उमेदवार रिंगणात असलेल्या या निवडणुकीतील विजयासाठी १३,०६२ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र एकाही उमेदवाराला मतांचा हा कोटा पूर्ण करता आला नाही. एकूण ४४ हजार ५२६ मतदारांपैकी २७,७६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या फेरीत १५३५ मते अवैध ठरली. १०७ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीसाठी मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. मात्र १६ व्या फेरीअखेर कोणीही उमेदवार निश्चित मतांचा कोटा पूर्ण करू शकला नाही. अखेर निवडणूक निरीक्षक सीमा व्यास, विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डी. आर. बनसोड यांनी १६ व्या फेरीअंती निर्माण झालेला पेचप्रसंग राज्य निवडणूक आयोगाला कळविला. या फेरीअखेर सर्वाधिक मते असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित करण्याबाबत मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास परवानगी मागण्यात आली. मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकाच्या पसंतीची मतमोजणी करण्याची तयारीसुद्धा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने १६ व्या फेरीत सर्वाधिक मते प्राप्त करणाऱ्यांना विजयी घोषित करण्याची परवानगी दिली. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी डी. आर. बनसोड यांनी शिक्षक आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना विजयी घोषित केले. बनसोड यांच्या हस्ते देशपांडे यांना रात्री १ च्या सुमारास विजयाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव चिमाजी, मतमोजणी पर्यवेक्षक अधिकारी रवींद्र धुरजड हे उपस्थित होते. यावेळी देशपांडे समर्थकांनी एकच जल्लोष केला. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पार पडली. रिंगणात असलेल्या १७ उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराने पहिल्या फेरीत १३,०६२ मतांचा कोटा पूर्ण केला नाही. परिणामी दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकासाठी मतमोजणी करण्यात आली. १५व्या फेरीअखेर शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांनी ११ हजार १५४ मते प्राप्त करून मतांची आघाडी कायम ठेवली.शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणीत ११व्या फेरीअखेर अरुण शेळके यांना ५६८४ तर वसंत खोटरे यांना ४२८७ मते प्राप्त केली होती. शेखर भोयर १६१३, श्रीकृष्ण अवचार १४९१, सुभाष गवई १२१२, प्रकाश तायडे १०६८, संतोष हुशे यांना ९३९ मते प्राप्त केली. १२व्या फेरीअखेर श्रीकांत देशपांडे ९८४३, अरुण शेळके ५८१४, वसंतराव खोटरे ४४३०, शेखर भोयर १७००, श्रीकृष्ण अवचार १६२१ मते मिळालीत. १३व्या फेरीत श्रीकांत देशपांडे यांना १० हजार १४५, अरुण शेळके ५ हजार ९९६, वसंतराव खोटरे यांना ४५०५ एवढी मते मिळालीत. १४व्या फेरीत श्रीकांत देशपांडे यांना १० हजार ६८८ मते मिळाली. अरुण शेळके ६ हजार १०७ तर वसंतराव खोटरे यांना ४ हजार ६११ मते मिळाला. १५व्या फेरीत श्रीकांत देशपांडे यांना ११ हजार १५४, अरुण शेळके ६ हजार ३५२ व वसंतराव खोटरे यांना ४ हजार ७६८ मते मिळाली.२२ हजार १२२ वैध मतांपैकी पहिल्या फेरीत श्रीकांत देशपांडे यांना ८ हजार ७८८, अरुण शेळके ५ हजार ३५१, वसंत खोटरे ४ हजार १६, शेखर भोयर १४६०, गणपत अवचार १३७७, प्रकाश तायडे १००६, सुभाष गवई ११२१, वर्षा निकम ६६६, विजय गुल्हाने ५०६, रामदास बारोटे ६२२, नरहरी अर्डक १५१, अजमल खान ३४, गुलाम अहेमद खान ७८, जयदीश देशमुख १३, सर्जेराव देशमुख ४, रवींद्र मेंढे ५८, संतोष हुसे यांना ८७१ इतकी मते प्राप्त केली. (प्रतिनिधी)