लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक वर्ष रखडलेला अयोध्येचा प्रश्न आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीमुळेच निकाली लागला. हा निर्णय आता दिला असला तरी उच्च न्यायालयाने त्यापूर्वीच स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख सदस्य म्हणून श्री श्री यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. अत्यंत शांततेने आणि समन्वयाने हा प्रश्न निकाली लागावा आणि अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी श्री श्री यांनी परिश्रम केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे स्पष्ट केले.तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ आध्यात्मिक गुरु व आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी, गडकरी बोलत होते. यावेळी, खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष आ. अनिल सोले, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. मोहन मते, आ. कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, आ. रामदास आंबटकर, आ. विकास कुंभारे, माजी आ. सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनिषा कोठे, माजी महापौर नंदा जिचकार, डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ कवी मधुप पाण्डेय, नगरसेवक संदीप गवई, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, संस्कार भारतीच्या महानगर अध्यक्ष कांचन गडकरी उपस्थित होते. संचालन रेणुका देशकर यांनी केले. प्रास्ताविक आ. अनिल सोले यांनी केले.खासदार क्रीडा महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सवाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आता शैक्षणिक क्षेत्रासाठी ‘खासदार शैक्षणिक महोत्सव’ आयोजित करण्याचा मानस यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला. केवळ भौतिक विकास पुरेसा नाही तर व्यक्तीचा आणि पर्यायाने समाजाचा सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा गुणांचा विकासही आवश्यक आहे. लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकसंस्कार या त्रिसूत्रीचा संयोग खासदार सांस्कृतिक महोत्सवात होत असल्याचे ते म्हणाले. श्री श्री रविशंकर हे आपले सांस्कृतिक राजदूत आहेत. आपल्या ऐतिहासिक संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार त्यांनी जगभरात केला आहे. त्यांच्याच प्रेरणेतून ‘सूरताल संसद’ हा भव्य कार्यक्रम आकाराला आल्याचेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.साहित्य-संस्कृतीमुळेच जाणिवा समृद्ध होतात - श्री श्री रविशंकर
अयोध्या प्रश्नाचा निकाल लागण्याचे श्रेय श्री श्री रविशंकर यांना : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 00:01 IST
अनेक वर्ष रखडलेला अयोध्येचा प्रश्न आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीमुळेच निकाली लागला. अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी श्री श्री यांनी परिश्रम केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे स्पष्ट केले.
अयोध्या प्रश्नाचा निकाल लागण्याचे श्रेय श्री श्री रविशंकर यांना : नितीन गडकरी
ठळक मुद्देक्रीडा, सांस्कृतिक महोत्सवानंतर ‘शैक्षणिक महोत्सव’ होणारतिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ