५ मे रोजी स्वीकारणार पदभार : विदर्भाच्या मागणीला मिळणार ताकदनागपूर : स्वतंत्र विदर्भासह देशभरात अनेक छोट्या राज्यांची मागणी सुरू आहे. शासन दरबारी त्यांची मागणी रेटून धरण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावर नॅशनल फेडरेशन फॉर न्यू स्टेट (एनएफएनएस) ही संघटना कार्य करीत असते. या संघटनेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भासह देशातील छोट्या राज्यांच्या मागणीला आणखी ताकद मिळेल. अॅड. श्रीहरी अणे यांनी शुक्रवारी नागपुरात यासंबंधीची माहिती देत आपण हे पद स्वीकारण्यास तयार असल्याचे जाहीर केले. येत्या ५ मे रोजी नवी दिल्ली येथे हे पद स्वीकारणार आहोत, असे अॅड. अणे यांनी सांगितले. माजी लोकसभा अध्यक्ष पी.ए. संगमा यांनी या फेडरेशनची स्थापना केली होती. तेलंगणा राज्याच्या मागणीमध्ये या फेडरेशनची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांनी दिल्लीमध्ये तेलंगणाचा मुद्दा लावून धरला होता. बुंदेलखंड राज्यासाठी लढणारे राजा बुंदेला हे या फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. आपल्याला अध्यक्षपद स्वीकारण्यास सांगितले होते तेव्हा आपण त्यांना केवळ एकच अट घातली होती, ती म्हणजे बुंदेलखंडसह विदर्भाची मागणी दिल्ली दरबारी लावून धरणे ही होय.आपण हे पद स्वीकारण्यास तयार आहोत. बुंदेलखंडसोबत विदर्भाचा मुद्दा आपण दिल्लीमध्ये लावून धरू.
नॅशनल फेडरेशन फॉर न्यू स्टेटच्या अध्यक्षपदी श्रीहरी अणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 03:05 IST