शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला १० वर्षे कारावास लग्नाचे आमिष दाखवून

By admin | Updated: January 18, 2017 02:34 IST

लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी एका ५० वर्षीय आरोपीला

१६ वर्षीय मुलीवर अत्याचार नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी एका ५० वर्षीय आरोपीला लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्याचे (पोक्सो)विशेष न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून ८ हजार रुपये पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. ज्ञानेश्वर आखाडू मौजे (५०), असे आरोपीचे नाव असून तो हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी पन्नासे येथील रहिवासी आहे. ओळख आणि अल्पवयाचा गैरफायदा घेऊन आपण वडिलाच्या वयाचे आहोत याची जाणीव असूनही आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीवर अत्याचार केले होते. ती गरोदर राहिल्याने आपले हे कृत्य उघड होऊ नये म्हणून त्याने मुलीला आपल्या आईसोबत हिंगणा बाजारात गेली असता २७ जानेवारी २०१४ रोजी पळवून नेले होते. पुढे नाव बदलवून तिला पत्नीप्रमाणे ठेवले होते. खासगी इस्पितळात ती बाळंत झाली होती. परंतु मूल अशक्तपणाने मरण पावले होते. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी ८ फेब्रुवारी २०१४ रोजी भादंविच्या ३६३, ३६६ (अ), ३७६ (२)(ज), लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करून २६ नोव्हेंबर २०१४ रोजी आरोपीला अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडके यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपीला भादंविच्या ३६३ कलमांतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास, ५ हजार रुपये दंड, कलम ३७६ (२)(ज) आणि पोक्सो कायद्यांतर्गत १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी तर आरोपीच्यावतीने अ‍ॅड. गिरडे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल सुनील कडू, भानुदास चिव्हाणे आणि रविकिरण भास्करवार यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)