शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

खांद्याचे दुखणे गंभीर आजाराचे लक्षण

By admin | Updated: July 17, 2017 02:49 IST

खांद्याच्या दुखण्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. परंतु हे दुखणे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

सत्यजित जगताप यांची माहिती : ‘आॅर्थाेस्कोपी मीट’चा समारोपलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खांद्याच्या दुखण्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. परंतु हे दुखणे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. यामुळे तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन निदान केल्यास यावर यशस्वी उपचार करणे शक्य होते. मात्र अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, खांदा निखळण्याची समस्या निर्माण होते. यातही वारंवार खांदा निखळण्याकडे दुर्लक्ष केल्यास शस्त्रक्रियेचा यशाचा दरही कमी होतो. या समस्येवर दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया महत्त्वाची ठरते, अशी माहिती आॅर्थाेस्कोपी सोसायटी नागपूरचे अध्यक्ष व प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सत्यजीत जगताप यांनी येथे दिली.आर्थाेस्कोपी सोसायटी नागपूरच्यावतीने आयोजित दोन दिवसीय ‘आर्थाेस्कोपी चिंतन’ बैठकीचा रविवारी समारोप झाला. यावेळी ते ‘लोकमत’शी बोलत होते.डॉ. जगताप म्हणाले, अनियमित जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे पाठीचे दुखणे आणि गुडघेदुखीचे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यानंतर खांदा हा तिसऱ्या क्रमांकाचा हाडाशी निगडित आजार म्हणून पुढे येत आहे. खांद्याच्या मांसपेशी क्षतिग्रस्त झाल्यास, दुखणे असल्यास, हालचाली मंदावल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. यामुळे फाटलेल्या किंवा कमकुवत झालेल्या मांसपेशीवर उपचार करणे शक्य होते. परंतु अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. गंभीर समस्या निर्माण झाल्यावरच डॉक्टरांकडे जातात. अशावेळी उपचार करणे कठीण होते.या परिषदेचे संयोजन सचिव डॉ. कुलदीप देशपांडे यांनी लिगामेन्ट (अस्थिबंधन) या विषयावर चर्चासत्रात मार्गदर्शन केले. आर्थाेस्कोपी सोसायटी नागपूरचे सचिव डॉ. सतीश सोनार यांनी वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओद्वारे प्रात्याक्षिक दिले. परिषदेचे सचिव डॉ. प्रशांत पराते व डॉ. मुकेश लढ्ढा यांनी विविध चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या दोन दिवसीय परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. प्रवीण अग्रवाल, डॉ. तेजस वाघेला, डॉ. नेहा गोडघाटे, डॉ. समीर द्विडमुथे, डॉ. साकेत मुंधडा, डॉ. अमित हाडोळे, डॉ. नाविद अहमद, डॉ. अभिनव भटनागर, डॉ. विक्रम सप्रे, डॉ. मनोज पहूकर, डॉ. सुयोग राठी, डॉ. अमोल पाटील, डॉ. विवेक मोरे व डॉ. राहुल डवरी आदींनी सहकार्य केले.