शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मनपाच्या ‘कॅशलेस’ला अल्प प्रतिसाद

By admin | Updated: December 29, 2016 02:40 IST

कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने मोहीम उघडली आहे.

संकल्प कॅशलेसचा, व्यवहार नगदीचाच नागपूर : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने मोहीम उघडली आहे. याला प्रतिसाद देत महापालिका प्रशासनाने कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल सुरू केलेली आहे. कं त्राटदारांची बिले व नगरसेवकांचे मानधन आरटीजीव्दारे बँकेत भरले जात आहेत. रोखीचे किरकोळ व्यवहारही बंद करण्यात आलेले आहेत. कर भरण्याची यंत्रणा कॅशलेस करण्यासाठी सर्व झोन कार्यालये व मुख्यालयात स्वाईप यंत्रे लावण्यात आलेली आहेत. परंतु चार ते पाच टक्के कर यातून जमा होत आहे. नागरिकांची आजही रोखीच्याच व्यवहाराला पसंती असून स्वाईप व आॅनलाईनला अल्प प्रतिसाद आहे. (प्रतिनिधी) झोनमध्ये रोखीचेच व्यवहार महापालिकेच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर व मंगळवारी झोन कार्यालयात स्वाईप यंत्रे लावण्यात आलेली आहेत. परंतु या यंत्राचा वापर होत नाही. मंगळवारी झोनमध्ये स्वाईप यंत्राची सुविधा नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. येथे रोखीनेच कर भरला जात असल्याचे पाहणी दरम्यान आढळून आले. आॅनलाईनला प्रतिसाद वाढला कर आकारणी व कर संकलन विभागाकडून आॅनलाईन कर भरण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. यामुळे गेल्या काही महिन्यात आॅनलाईन कर भरण्याला प्रतिसाद वाढला आहे. गेल्या महिनाभरात मालमत्ता कराच्या वसुलीपैकी १५ टक्के कर आॅनलाईन जमा करण्यात आला आहे. धनादेशाव्दारे कर भरण्याची सुविधा महापालिकेच्या सर्व झोन कार्यालयात स्वाईप मशीनची सुविधा आहे. तसेच मालमत्ता कराची रक्कम धनादेशाव्दारे स्वीकारली जात आहे. यापूर्वी १ हजारापेक्षा अधिक रक्कम असेल तरच धनादेश स्वीकारला जात होता. परंतु आता कितीही रक्कम धनादेशाव्दारे स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आॅनलाईन १५ टक्के तर व स्वाईप यंत्राच्या माध्यमातून ५ टक्के वसुली होत आहे. मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त (एलबीटी विभाग) ओसीडब्ल्यूची स्वाईप बसविण्याची तयारी शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या आॅरेंज सिटी वॉटर(ओसीडब्ल्यू)ची झोन स्तरावर कार्यालये आहेत. या ठिकाणी नवीन वर्षात स्वाईप यंत्रे बसविण्यात येणार आहे. सध्या मात्र रोखीनेच पाणीपट्टी स्वीकारली जात आहे. सोबतच आॅनलाईन पाणीपट्टी भरण्याची ही सुविधा आहे. सचिन द्रवेकर , जनसंपर्क अधिकारी, ओसीडब्ल्यू