शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रुळावर येतेय रेल्वेतील चित्रपटांचे शूटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 10:52 IST

Nagpur News मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात चित्रपटांची शूटिंग पुन्हा रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. परिस्थिती सामान्य होण्यासाठी आणखी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देकोरोनामुळे ९ महिन्यांपासून बंद होते चित्रीकरण

आनंद शर्मा

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय चित्रपटांमध्ये रेल्वेस्थानक किंवा कोचमध्ये चित्रपटाची शूटिंग करण्यात येते. रेल्वेत केलेल्या चित्रपटांच्या चित्रीकरणाला प्रेक्षकांच्या वतीनेही चांगली पसंती मिळते. परंतु कोरोनाचा प्रभाव रेल्वेतील चित्रपटांच्या शूटिंगवर पडला. ९ महिन्यांपासून शूटिंग ठप्प झाली होती. आता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात चित्रपटांची शूटिंग पुन्हा रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. परिस्थिती सामान्य होण्यासाठी आणखी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

चित्रपटांच्या शूटिंगसाठी आतापर्यंत मुंबई रेल्वेला बॉलीवूडने आपला पहिला पसंतीक्रम दिला आहे. येथील तुर्भे, आप्टा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पनवेल, वठार, वाडी बंदर, सायन याशिवाय मध्य रेल्वेतील पुणे आणि कोल्हापूर रेल्वेस्थानकांवरही चित्रपटांची शूटिंग करण्यात येते. यामुळे रेल्वेला बराच महसूल मिळतो. मध्य रेल्वेला चित्रपटांच्या शूटिंगच्या माध्यमातून एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत १ कोटी ३३ लाख ८३ हजार ३७० रुपयांचा महसूल मिळाला. परंतु कोरोनामुळे शूटिंगवर ब्रेक लागल्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नाचा स्रोत थांबला. २९ ऑक्टोबर २०२० पासून पुन्हा शूटिंग सुरू झाली आहे. यामुळे २०२०च्या अखेरच्या ३ महिन्यात मध्य रेल्वेने १५ लाख ३९ हजार ५४३ रुपये मिळविले आहेत. लवकरच परिस्थिती सामान्य होऊन चित्रपटांच्या शूटिंगच्या माध्यमातून रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.

या चित्रपटांची झाली शूटिंग

कोरोनापूर्वी २०१९-२० मध्ये मध्य रेल्वेच्या रेल्वेस्थानक आणि कोचमध्ये रजनीकांतचा चित्रपट दरबार, सलमान खानचा दबंग ३, कंगना रनौतचा पंगा, शुभमंगल ज्यादा सावधान, रात अकेली है, चोक्ड, विजेता, मुंबई सागा, लालसिंह चड्डा, काली पिली, सूरज से मंगल भारी फिल्म, क्लास ऑफ ८३, समांतर, १००, वॉर स्टोरी, १९६२ वेबसीरिज, हरामी, अटेंशन व्हिजिटर्स या माहितीपटांची शूटिंग झाली. कोरोनामुळे ९ महिन्यांपर्यंत चित्रपट निर्माते रेल्वेपासून दूर राहिले. २०२०-२१ मध्ये ऑक्टोबरच्या अखेरपासून हसीन दिलरुबा व अनोखी तसेच वेबसीरिज समांतर २ च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

शूटिंगसाठी लवकरच ऑनलाइन बुकिंग

‘कोरोनामुळे ९ महिन्यापर्यंत रेल्वेत चित्रपट, वेबसीरिज, माहितीपटांची शूटिंग प्रभावित झाली होती. परंतु आता परिस्थितीत बदल होत आहे. शूटिंग पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे पुढील ४ ते ५ महिन्यात परिस्थिती पूर्वपदावर येण्याची अपेक्षा आहे. चित्रपट निर्मात्यांसाठी रेल्वे स्टेशन, कोचच्या ऑनलाइन बुकिंगची सुविधा मध्य रेल्वेतर्फे लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

 

..............

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे