शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सरकारने अ‍ॅण्टी बॉडी टेस्ट कीटची मागणीच केली नाही : हायकोर्टाने फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 20:31 IST

कोरोनाचे रुग्ण सतत वाढत असतानाही राज्य सरकारने केंद्र सरकारला रॅपिड अ‍ॅण्टी बॉडी टेस्ट कीटची मागणी केली नाही ही धक्कादायक माहिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली.

ठळक मुद्देतीन दिवसात मागणी करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे रुग्ण सतत वाढत असतानाही राज्य सरकारने केंद्र सरकारला रॅपिड अ‍ॅण्टी बॉडी टेस्ट कीटची मागणी केली नाही ही धक्कादायक माहिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले व येत्या तीन दिवसामध्ये केंद्र सरकारकडे रॅपिड अ‍ॅण्टी बॉडी टेस्ट कीटची मागणी करण्याचे निर्देश दिले.सी. एच. शर्मा व सुभाष झंवर यांच्या जनहित याचिकांमध्ये कोरोनाचा विषय हाताळला जात असून त्यावर न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, केंद्र सरकारचे वकील अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर यांनी आपल्याकडे पाच लाखावर रॅपिड अ‍ॅण्टी बॉडी टेस्ट कीट उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच, महाराष्ट्र सरकारने या कीटची मागणी केली नसल्याची माहिती दिली. काही ठिकाणी या कीटचे निकाल सदोष आले आहेत. त्यामुळे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने रॅपिड अ‍ॅण्टी बॉडी टेस्ट थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. परिणामी, कीट वाटपावर गुरुवारी रात्री अंतिम निर्णय घेतला जाणार आहे याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.डॉ. अनुप मरार यांनी या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करून कोरोना निदानाकरिता रॅपिड अ‍ॅण्टी बॉडी टेस्ट सुरू करण्याचा मुुद्दा उपस्थित केला होता. या चाचणीला पीसीआर चाचणीपेक्षा कमी खर्च व वेळ लागतो. सध्या कोरोना निदानासाठी पीसीआर चाचणी केली जात आहे. ही चाचणी वेळखाऊ व खर्चिक आहे असे त्यांचे म्हणणे आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने ३० मार्च रोजी राज्य सरकारला रॅपिड अ‍ॅण्टी बॉडी टेस्ट सुरू करण्यावर निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. परंतु, राज्य सरकारने ही बाब गांभिर्याने घेतली नसल्याचे केंद्र सरकारच्या माहितीवरून न्यायालयाच्या निदर्शनास आले. करिता, न्यायालयाने वरील निर्देश दिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या